Webcam ने व्हिडीओ कॉल करण्यात येत आहे अडचण ? अशी सोडवा तुमची समस्या

Webcam Tips : जर तुम्हाला वेबकॅमवरून व्हिडिओ कॉल करताना समस्या येत असतील तर या टिप्स फॉलो करा. यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो

Webcam ने व्हिडीओ कॉल करण्यात येत आहे अडचण ? अशी सोडवा तुमची समस्या
Image Credit source: Unsplash
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 12:05 PM

नवी दिल्ली : कोविड काळापासून वर्क फ्रॉम होमचा (work from home) जमाना सुरू झाला असून आजही बरेच जण घरून काम करत असतात. काहीवेळा मुलांच्या शाळाही ऑनलाइन (online classes) असतात. तर काही लोकं ऑफीसची मीटिंगही घरातून ऑनलाइन अटेंड करतात. अशा परिस्थितीत ऑफीस किंवा शाळेसाठी बऱ्याच वेळेस व्हिडीओ कॉलिंगद्वार उपस्थित राहताना काही वेळेस कॅमेऱ्याची समस्या उद्भवू शकते. वेबकॅमवरून (webcam) व्हिडिओ कॉलवर (video call) मीटिंग किंवा क्लास जॉईन करताना जाताना अनेक वेळा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, अनेक वेळा या समस्यांमुळे तुम्हाला मीटिंगमध्ये आणि वर्गात व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येत नाही, पण आता तुम्हाला यासाठी फारशी काळजी करण्याची गरज नाही.

या समस्येला तोंड देण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया. त्या टिप्सच्या मदतीने तुम्ही वेबकॅमच्या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

या टिप्स करा फॉलो

कनेक्शन चेक करावे

व्हिडिओ कॉल दरम्यान तुमचा कॉल वारंवार डिस्कनेक्ट होत असेल किंवा बफरिंग होत असल्यास, तुमचे कनेक्शन नीट तपासा. कनेक्शनमध्ये कोणतीही समस्या नसल्यास, एकदा इंटरनेट कनेक्शन बंद करा व थोड्या वेळाने ते पुन्हा सुरू करून पहा.

लॅपटॉप रीस्टार्ट करून पहा

तुम्ही वर्गात किंवा मीटिंगमध्ये उपस्थित रहात असाल आणि व्हिडिओ कॉल कनेक्ट करण्यात अडचण येत असेल, तर लॅपटॉप किंवा मोबाईलवर उघडलेले अतिरिक्त टॅब बंद करा. यानंतरही त्यांचे कार्य नीट सुरू नसेल तर सिस्टम रीस्टार्ट करा. मोबाईलही एकदा स्विच ऑफ व स्विच ऑन करून बघा.

सॉफ्टवेअर चेक करावे

काहीवेळा सिस्टमचे सेटिंग बदलल्यामुळेही व्हिडीओ कॉलवर करण्यात समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि वेबकॅम सेटिंग्ज पुन्हा सेट करण्याची आवश्यकता आहे. यानंतर सिस्टम रीस्टार्ट करा.

व्हिडीओ कॉल क्वॉलिटी कशी वाढवाल ?

वेबकॅमवर बर्‍याच वेळा धूळ जमा होते ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल दरम्यान सर्वकाही अस्पष्ट दिसते. अशा परिस्थितीत, आपण नेहमी आपल्या लॅपटॉपची देखभाल करणे आणि धुळीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय नियमितपणे सुती कापडाने तुमचा वेबकॅम स्वच्छ करत रहावा.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.