सिम कार्डविषयी बदलले नियम, 1 डिसेंबरपासून होणार लागू

SIM Card | सिम कार्डविषयीचा नियम बदलला आहे. त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2023 रोजीपासून होत आहे. जर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करण्याच्या विचारात असाल अथवा सिम कार्ड विक्रेता असला तर त्याचा परिणाम दिसून येईल. सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे पाऊल टाकलं आहे.

सिम कार्डविषयी बदलले नियम, 1 डिसेंबरपासून होणार लागू
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : आधुनिक जीवनशैलीत मोबाईलशिवाय आपण एक क्षण पण राहू शकत नाही. त्यामुळे मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सिम कार्ड नियमांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. सिम कार्डविषयीचा हा नियम 1 डिसेंबर 2023 रोजीपासून म्हणजे शुक्रवारपासून लागू होत आहे. जर तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका ओळखपत्रावर सिम खरेदीला बंधन येतील. अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई प्रस्तावित आहे.

यासाठी नियमात बदल

बोगस सिमकार्डचे सध्या पेव फुटले आहे. तसेच त्याआधारे फसवणुकीचे प्रकार पण वाढले आहेत. वाढत्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात येतील. हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात लागू होतील. त्यामुळे बोगस सिमकार्ड आधारे करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगाची तरतूद आहे.

हे सुद्धा वाचा

असा होईल बदल

  • सिम डीलर व्हेरिफिकेशन – सिम कार्ड डीलरसाठी नियमात कडक तरतूद करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना डीलरचे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना एजन्सी देता येणार नाही. त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन, पडताळा अनिवार्य करण्यात आला आहे. नाहीतर टेलिकॉम कंपनीला 10 लाख रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
  • आधार कार्डची प्रत – ज्या ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करायचे आहे. त्यांना आधार कार्डशिवाय सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. इतर कोणाच्या आधारचा वापर केल्याचे आढळल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे
  • सिम कार्डची मर्यादा – नवीन नियमांनी किती सिमकार्ड असावेत याची मर्यादा स्पष्ट केली आहे. व्यावसायिक वापरासाठी घाऊक सिम कार्ड खरेदीबाबत नवीन नियम आला आहे. तर एका ओळखपत्रावर वैयक्तिक वापरकर्त्याला 9 सिम कार्ड खरेदी करता येतील.
  • डीएक्टिव्हसाठी कालावधी –तुमचे सिमकार्ड तुम्ही बंद केले. ते डिएक्टिव्ह झाल्यावर 90 दिवसांचा वेटिंग पिरियड असेल. तीन महिन्यानंतर हा क्रमांक इतर व्यक्तीला देता येईल.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.