आता प्रवासात लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगचं टेन्शन विसरा, वापरा ही खास पॉवरबँक
प्रवासात चार्जिंग करण्याची चिंता असलेल्यांसाठी ही खास बातमी आहे. तुम्ही लॅपटॉप घेऊन प्रवासात जात असाल तर आता तुम्हाला चार्जिंगसाठी कोणत्याही प्रकारच्या लांब वायरची गरज नाही. हो, आता प्रवासात लांब वायर घेऊन जाण्याची गरज नाही. ‘हा’ पॉवरबँक तुमचा फोन, इयरबड, टॅब्लेट आणि लॅपटॉप सहज चार्ज करू शकतो.
तुम्हाला प्रवासाता लॅपटॉप, फोन, इयरबड किंवा टॅब्लेट चार्जिंग करण्याची चिंता आहे का, तर टेन्शन घेऊन नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती सांगणार आहोत. आता तुम्हाला प्रवासात कोणत्याही प्रकारचं लांब वायर नेण्याची गरज नाही. आम्ही एक असा पॉवरबँक सांगणार आहोत, जो फोन, इयरबड, टॅब्लेट आणि लॅपटॉप सहज चार्ज करू शकतो. याविषयी सविस्तर वाचा.
हल्ली अनेकांकडे स्मार्टवॉच, स्मार्टफोन, इयरबड्स आणि लॅपटॉपसह अनेक डिव्हाईसेस असतात. या डिव्हाईसेसना चार्जिंगची आवश्यकता असते. अशावेळी प्रत्येकाचे चार्जर प्रवासात किंवा कोठेही बाहेर घेऊन जाणे थोडे अवघड होऊन बसते. यावर आम्ही एक उपाय सांगणार आहोत.
आम्ही काही पॉवरबँक्स आणि डिव्हाईसबद्दल सांगणार आहोत, जे एकाच वेळी आपले अनेक डिव्हाईस चार्ज करू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण ज्या पॉवरबँकबद्दल बोलत आहोत तो केवळ फोनच नाही तर तुमचा लॅपटॉप देखील चार्ज करू शकते. यामुळे सविस्तर जाणून घ्या.
मल्टीपल डिव्हाईस चार्जिंग पॉवरबँक
Callmate चा Vanguard पॉवरबँक तुमचा सर्वोत्तम डिव्हाईस ठरू शकतो. 100W सपोर्टसह येणारा हा हायस्पीड चार्जिंग पॉवरबँक यूएसबी-सी पोर्टसोबत येतो. लॅपटॉप पटकन चार्ज करू शकतो. याशिवाय तुमचा टॅबलेट आणि स्मार्टफोनही सहज चार्ज करता येतो.
20000 एमएएच क्षमतेची बॅटरी क्षमता आहे जी आपल्या एकाधिक डिव्हाइसेसला संपूर्ण दिवस चार्ज केले जाऊ शकते. हा पॉवरबँक क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 तंत्रज्ञानासह येते जो वेगवान आणि कार्यक्षम चार्जिंग प्रदान करते.
आकार स्लीक आणि कॉम्पॅक्ट
याचा आकार स्लीक आणि कॉम्पॅक्ट असल्याने तो लहान पिशव्यांमध्ये सहज वाहून नेता येतो. प्रवासात मल्टिपल डिव्हाईस चार्जिंगसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
किंमत काय आहे आणि कुठे खरेदी करावा?
तुम्हाला हा पॉवरबँक खरेदी करायचा असेल तर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता आणि कोलमेटच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. 3,999 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुमच्या बजेटचा हा पॉवरबँक ठरू शकतो. तसेच याचा तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाईसेससाठी देखील वापर करू शकतात.
Lifelong 65W पॉवर बँक
Lifelong 65W हा पॉवरबँक देखील एक उत्तम पर्याय असू शकतो, तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केवळ 4,499 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला 200000 एमएएच ची बॅटरी मिळते आणि लॅपटॉपला सुपरफास्ट चार्जिंग मिळते. याशिवाय तुम्हाला हवं असेल तर HEYMIX 100W लॅपटॉप पॉवरबँकही पाहू शकता. अॅमेझॉनवर 55 टक्के डिस्काउंटसह 4,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.