तुमच्या मुलांच्या हातातही रात्रंदिवस मोबाईल असतो? मग या काही महत्त्वाच्या सेटिंग्स कराच!
सध्या सगळीकडे मोबाईलची क्रेज एवढी वाढली आहे कि येता जाता प्रत्येक लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. त्यामुळे त्याचा परिणाम हा मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि खेळावर होत आहे.
आजच्या घडीला प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल हा असतोच. सध्या सगळीकडे मोबाईलची क्रेज एवढी वाढली आहे कि येता जाता प्रत्येक लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. त्यामुळे त्याचा परिणाम हा मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि खेळावर होत आहे. जर तुमचं मूल दिवस-रात्र फक्त फोनवर असेल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात? तर अशा वेळी मुलाला मोबाईल देण्यापूर्वी तुमच्या मोबाईलच्या काही सेटिंग्ज मध्ये बदल करा, अन्यथा तुमची समस्या दुप्पट होऊ शकते. जाणून घ्या कोणते बदल करायचे आहेत.
या सेटिंग्ज मध्ये बदल करा
– तुमच्या फोनमध्ये स्क्रीन टाइम लिमिट फीचर असेल तर हे फीचर वापरा, बहुतांश स्मार्टफोनमध्ये स्क्रीन टाइम लिमिट फीचर असते. या फीचरचा वापर करून तुम्ही फोनमध्ये टाइम सेट करून जेणे करून त्या वेळेनंतर फोन आपोआप लॉक होईल.
– आता अनेक मोबाईल कंपन्यांनी पालकांच्या गरजा लक्षात घेता स्मार्टफोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल फीचर्स मिळू लागले आहेत, हे फीचर खास पालकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. हे फीचर वापरल्यानंतर तुमची मुलं त्यांच्या वयानुसार कंटेंट पाहू शकतील.
– जर तुमच्या फोनमध्ये अनेक ॲप्स असतील तर तुमच्या मुलांसाठी योग्य नसलेले ॲप्स लॉक करा जेणेकरून मुलं त्यांच्या वयासाठी योग्य नसलेल्या ॲप्स ॲक्सेस करू शकणार नाहीत.
– मुलांना युट्युबवर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर किड्स मोड फीचर आता यूट्यूबवर उपलब्ध आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर मुलांना फक्त किड फ्रेंडली कंटेंट दिसेल.
– मुलांच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी नाईट किंवा डार्क मोड चालू करा जेणेकरून मुलांच्या डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही.
– तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोनमध्ये डेटा लिमिट देखील सेट करू शकता जेणेकरून मुलं त्या मर्यादेपर्यंतच इंटरनेट वापरू शकतील. असे केल्याने स्क्रीन टाईम नियंत्रित करता येऊ शकतो.
अश्या तऱ्हेने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेटिंग करून मुलांना फोन देऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा कि जर तुम्ही मुलांसमोर फोन वापरत असाल तर मूलही तेच शिकतील, अशा वेळी जर तुम्हाला मुलं सतत फोनवर राहू नये असं वाटत असेल तर तुम्ही ही मुलांसमोर फोन चालवण्याची सवय बदलली पाहिजे.