देसी ट्विटर Koo App मधून चिनी गुंतवणूकदाराचा काढता पाय
Koo या अॅपमध्ये एका चिनी गुंतवणूकदाराने काही पैसे गुंतवले होते. परंतु त्यांनी आता यामधून काढता पाय घेतला आहे.
मुंबई : रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo App मध्ये सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं होतं. भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपला घेऊन सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेलं Koo हे अॅप भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंगचा अनुभव देतं. (Chinese investor exits from koo parent firm, here are the details to know)
त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, काही सरकारी विभागांनी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट Koo वर आपलं खातं सुरु केलं आहे. काही ट्वीट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याचे सरकारचे आदेश ट्विटरकडून पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. Koo ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाचे हँडल सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, आता या अॅपबाबत अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. कू या अॅपमध्ये एका चिनी गुंतवणूकदाराने काही पैसे गुंतवले होते. परंतु त्यांनी आता यामधून काढता पाय घेतला आहे. याबाबत बोलताना कू चे संस्थापक आणि सीईओ अप्रेम्य राधाकृष्ण म्हणाले की, कू मधील गुंतवणूकदारांनी त्यांची (चिनी गुंतवणूकदार) हिस्सेदारी खरेदी करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
‘आत्मनिर्भर भारत’वर पूर्ण फोकस
गुगल प्ले स्टोर वर कू च्या डाउनलोडेड पेजवर या अॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ असं म्हटलं आहे. यावर तुम्ही तुमच्या भाषेत तुमची मतं व्यक्त करु शकता. ‘कनेक्ट विथ इंडियन्स इन इंडियन लँग्वेजेस’ अशी कू ची टॅगलाईन आहे. हा एक पर्सनल अपडेट आणि ओपनियन शेयरिंग मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे.
I am now on Koo.
Connect with me on this Indian micro-blogging platform for real-time, exciting and exclusive updates.
Let us exchange our thoughts and ideas on Koo.
? Join me: https://t.co/zIL6YI0epM pic.twitter.com/REGioTdMfm
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 9, 2021
Koo ने सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या काही प्रमुख संघटनांनी भारताचे स्वदेशी मायक्रोब्लॉगिंस साईट Kooवर आपले खाते उघडले आहे. हे पाऊल म्हणजे ट्विटरविरोधातील एक प्रतिक्रिया आहे. ट्विटरने 257 ट्वीट आणि ट्विटर खात्यांवर निर्बंध लादण्याचा सरकारच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्या ट्विटर खात्यावरुन हिंसाचाराबाबत काही ट्वीट करण्यात आले होते.
Koo मध्ये काय खास?
भारतीय संदर्भाने Koo एक व्हॅल्यूएबल आणि पॉवरफूल प्लॅटफॉर्म आहे. हे App 10 महिन्यांपूर्वीच सुरु झालं आहे. या App ने गेल्या वर्षी सरकारचं आत्मनिर्भर चॅलेंज जिंकलं होतं. याचा उद्देश स्थानिक App विकास करणं हा होता. ट्विटरप्रमाणेच Koo युजर्सना लोकांना फॉलो करण्याची परवानगी देतं. हे App युजर्सना मॅसेज लिहिणं, तसंच ऑडिओ, व्हिडीओ फॉरमॅटमध्ये एकमेकांना पाठवण्याची परवानगी देतं. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.
हे ही वाचा
भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली
आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर
(Chinese investor exits from koo parent firm, here are the details to know)