Chocolate Day | खास व्यक्तीला द्यायचंय चॉकलेट? अवघ्या काही मिनिटांत मिळेल डिलिव्हरी
Chocolate Day | सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु आहे. अनेक जण काय काय योजना आखत आहेत. त्यात तुम्ही पार्टनरसाठी चॉकलेट खरेदी करायचे विसरलात तर चिंता करु नका. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अथवा तुमच्या आवड्यात व्यक्तीला 8 ते 20 मिनिटांत चॉकलेट मिळू शकते. टॉप ब्रँडच्या चॉकलेटच्या पॅकवर तुम्हाला घसघशीत सवलत पण मिळेल.
नवी दिल्ली | 9 February 2024 : आज व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस आहे. या दिवसाला चॉकलेट डे म्हणतात. या दिवशी तुम्ही तुमच्या खास मित्राला, घरातील व्यक्तीला, नातेवाईकांना, चॉकलेट गिफ्ट देऊ शकता. जर तुम्ही एखाद्या आयुष्यात गोडवा आणू इच्छित असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरुन चॉकलेट बॉक्स ऑर्डर करु शकता. फास्टेस्ट डिलिव्हरी ॲप ब्लिंकिट तुम्हाला 8 ते 20 मिनिटांमध्ये ऑर्डर डिलिव्हरी करण्याची सुविधा देते. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चॉकलेट बॉक्सचे एकाहून एक पर्याय तर मिळतीलच पण त्यावर तुम्हाला घसघशीत सवलत पण मिळेल.
- Open Secret Chocolate Nutty Cookies – हा चॉकलेट बॉक्स तुमच्या बजेटमध्ये येईल. या 150 g च्या हँपरवर ग्राहकांना 30 टक्क्यांची सवलत मिळते. हा बॉक्स तुम्ही केवळ 245 रुपयांना खरेदी करु शकता. तर 2 x 150 g चा बॉक्स ग्राहकांना केवळ 483 रुपयांना खरेदी करता येईल.
- Ferrero Rocher Chocolate Gift Pack – Ferrero Rocher चॉकलेट हे प्रीमियम चॉकलेट्स पैकी एक आहे. याची मुळ किंमत 929 रुपये आहे. पण ब्लिंकिट या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 300 g च्या पॅकवर 20 टक्के सवलत मिळेल. हे पॅक तुम्हाला 741 रुपयांना खरेदी करता येईल.
- Amul Chocominis Chocolate Gift Pack – अमूल चॉकलेटचा 250 g चा बॉक्स तुम्हाला केवळ 140 रुपयांना मिळेल. या चॉकलेटचा दर्जा, चव चांगली आहे. हा चॉकलेट बॉक्स तुम्ही सहज पॅक करुन भेट म्हणून देऊ शकता.
- Nutty Tuxedo Chocolate Popcorn – या चॉकलेटचे तुम्हाला 2 पॅक मिळतील. या चॉकलेटचा लूक एकदम क्लासिक आहे. गिफ्ट देण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. या चॉकलेटचा 150 g चा बॉक्स तुम्हाला केवळ 214 रुपयांना मिळेल. जर तुम्ही 2 x 150 g चा डब्बा खरेदी केला तर सवलतीसह हा चॉकलेट बॉक्स तुम्हाला 405 रुपयांना मिळेल.
हे पण लक्षात घ्या
या प्लॅटफॉर्मने 8 ते 20 मिनिटांत चॉकलेट बॉक्स डिलिव्हरीचा दावा केला आहे. पण तुमच्या शहरातील वाहतूक कोंडीवर डिलिव्हरी बॉय किती मिनिटात येईल, हे सांगता येणार नाही. त्याला मध्येच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यास त्याला थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला नाहक कुरकुर करता येणार नाही. तुमच्या परिसरात या प्लॅटफॉर्मवरुन डिलिव्हरी मिळते का ते पण तपासा.