आता केव्हाही पडू शकतो पाऊस, जाणून घ्या काय आहे क्लाऊड सिडींग?, आयआयटी कानपूरमध्ये प्रयोग यशस्वी
Cloud Seeding : आता देशातील कोणत्याही भागात पाऊस पडू शकतो. आयआयटी कानपूरसाठी हा प्रयोग सोपा नव्हता. हा प्रयोग पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा वर्षे लागले. जाणून काय आहे क्लाऊड सिडींग...
क्लाऊड सिडींगचा अर्थ पावसाची पेरणी. याचा वापर करून कृत्रीम पाऊस पाडला जाऊ शकतो. आयआयटी कानपूरसाठी हा प्रयोग सोपा नव्हता. हा प्रयोग पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा वर्षे लागले. या प्रोजेक्टवर मणींद्र अग्रवाल आनंदी आहेत. या यशाचं क्रेडिट त्यांनी टीमला दिले. जाणून घ्या काय असते क्लाऊड सिडींग आणि त्याची प्रक्रिया.
कोविडने सर्वांना थांबविले तेव्हा…
प्रो. मणींद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, या प्रोजेक्टची सुरुवात २०१७ मध्ये झाली. एअरक्राफ्टसाठी एक उपकरण हवं होतं ते अमेरिकेवरून येणार होते. २०१९ मध्ये आर्डर देण्यात आली. पण, काही दिवसांनी कोविड आले आणि सर्व काही ठप्प झालं.
उपकरण गेल्या वर्षी आले तेव्हा एअरक्रॉफ्टच्या बदलासाठी परवानगी घ्यावी लागली. अमेरिकेवरून इंजिनीअरला येण्यास उशीर झाला. अशाप्रकारे खूप साऱ्या समस्यांनंतर हा प्रयोग यशस्वी झाला.
एअरक्रॉफ्ट उडाले. त्याने सीड विखुरले आणि परत आले. परीक्षण करणार होते तेव्हा चांगलाच पाऊस पडला. पण, त्यामुळे या अभियानाला फारसा फरक पडला नाही. आता भारत अशा स्थितीत आहे की, केव्हाही पाऊस पाडता येऊ शकते.
कसे होते क्लाऊड सिडींग
हा प्रयोग फक्त आयआयटी कानपूरसाठी नव्हे, तर संपूर्ण देशात महत्त्वाचा आहे. कारण ही चाचणी यशस्वी झाल्याने याचा वापर दुष्काळासोबत दोन हात करताना तसेच वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करता येऊ शकतो.
पावसासाठी ढग असणे गरजेचे आहे. एअरक्रॉफ्ट आकाशात जाऊन ढगांची पेरणी करतो. यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. जेव्हा हे बीज ढगांना मिळते तेव्हा घनरुपात रुपांतरित होऊन पाऊस पडतो. ही काही साधी सोपी प्रक्रिया नाही.
अशी आहे पूर्ण प्रक्रिया
आकाशात बीज तयार करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. यात बर्फ, सिल्व्हर आयोडीनसह रासायनिक तत्व मिळून एअरक्रॉफ्टमध्ये खास टूल लावले जाते. एअरक्रॉफ्ट विशिष्ट उंचीवर गेल्यावर कृत्रीम पावसाचे बीज पेरणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळाने पाऊस पडतो. या पावसाचे थेंब थोडे मोठे असतात.