पेट्रोल इंजिनसह ‘या चार कार लाँच होणार

जगातील प्रदूषण पाहिले तर ते दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवरती एप्रिल 2020 पासून बीएस-6 प्रदूषण उत्सर्जनाचे नवे निकष लागू होणार आहे.

पेट्रोल इंजिनसह 'या चार कार लाँच होणार
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 8:52 PM

मुंबई : जगातील प्रदूषण पाहिले तर ते दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवरती एप्रिल 2020 पासून बीएस-6 प्रदूषण उत्सर्जनाचे नवे निकष लागू होणार आहे. यामुळे ऑटो कंपन्यांची झोप उडालेली आहे. याआधीच मारुती आणि टाटा कंपनीने घोषणा केली आहे की, डिझेलचे वाढते भाव पाहता आता डिझेल ऐवजी पेट्रोल इंजिनवर फोकस करणार आहे. तसेच या सेक्टरमध्ये पेट्रोल इंजिनच्या मागणीतही वाढ झाली आहे. सर्व कार कंपनी आपल्या प्रसिद्ध डिझेल कारला आता पेट्रोल व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये काही प्रसिद्ध कार आता पेट्रोल व्हर्जनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत.

महिंद्रा मराजो

महिंद्राने मोठ्या युजर्स ग्रुपला टार्गेट करत आपली एमपीव्ही कार मराजोला 9.99 लाख किंमतीत लाँच केली आहे. महिंद्रा मराजो केवळ डिझेल इंजिनमध्ये लाँच केली होती. पण पेट्रोल इंजिनमध्ये वाढत चाललेली मागणी पाहता, लवकरच कंपनी मराजोचे पेट्रोल व्हर्जनही लाँच करणार आहे. महिंद्रा येत्या 3-4 महिन्यात आपल्या कारमध्ये बीए-6 निकषानुसार इंजिन देणार आहे आणि महिंद्रा XUV300 पहिली कार असेल, ज्याला बीएस-6 मध्ये अपडेट केललं असेल.

महिंद्रा पेट्रोल व्हर्जन मराजो यंदाच्या दिवाळीमध्ये लाँच करणार असल्याची शक्यता आहे. मराजोमध्ये बीएस-6 आणि 1.5 लीटरचे टब्रोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. ही कार 120 बीएचपी पावर आणि 300 एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 मॅन्युअल गिअरबॉक्स आहे आणि 17.6 किमी प्रति लीटरचा मायलेज देते.

मारुती

मारुतीने 2018-19 मध्ये आपल्या सर्वात प्रसिद्ध एसयूव्ही विटारा ब्रेजाची 1.58 लाख यूनीट विक्री केली होती. आता 2020 पासून ते आपल्या कारमध्ये डिझेल इंजिन बंद करणार आहेत. सध्या मारुती फिएट 1.3 डिझल इंजिनचा वापर करत आहे. मारुतीने ब्रेझाला मार्च 2016 मध्ये लाँच केले होते. मारुतीमध्ये येणारे 4 सिलेंडर 1.3 लीटरचे DDiS 200 इंजिन 89 बीएचपी पॉवर आणि 200 एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरशिफ्ट मिळते. मारुती लवकरच आपली पेट्रोल इंजिनमध्ये नवीन कार लाँच करणार आहे.

मारुती एस-क्रॉस

आता मारुतीची क्रॉसओव्हर एस-क्रॉस कारही पेट्रोल इंजिनमध्ये लाँच करण्यात येणार आहे. एस-क्रॉस ला 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. यानंतर यामध्ये काही बदल झाले नाहीत. पण आता नव्या पेट्रोल व्हर्जनमध्ये सियाजचे 1.5 लीटरचा SHVS पेट्रोल इंजिन लावले जाईल. जे 104.7 पीएसची पावर आणि 138 एनएमचा टॉर्क जनरेट करेल. आतापर्यंत एस-क्रॉसमध्ये फिएटवाले 1.3 लीटरचे इंजिन होते. पण एप्रिल 2020 पासून वीन बीएस 6 निकषानुसार इंजिन लावले जाईल.

मारुती एस-क्रॉस जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाँच केली जाणार आहे. या कारची किंमत 8.86 लाख रुपये असेल.

टाटा हॅरिअर

टाटा हॅरिअरला यावर्षी 23 जानेवारी रोजी लाँच करण्यात आले होते. हॅरिअर केवळ डिझेल इंजिनसोबत येते. टाटा हॅरिअर कारमध्ये Kryotec 2.0 चे इंजिन दिले आहे. हे इंजिन भविष्यात BSVI  बीएस 6 निकष लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. याचे इंजिन 140 एचपी पावर आणि 350 एनएमता टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6 स्पीड गिअर बॉक्स दिले आहेत. कारची किंमत 12.69 लाख ते 16.25 लाखांपर्यंत असेल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.