Mobile Price : ग्राहकांना महागाईचा फटका; 2025 मध्ये नवीन स्मार्टफोन होईल महागडा
Smartphone Expansive : तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. देशात तर आता सरकारी कंपनीनेच 6 जी सेवेचा गजर केला आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये पण त्यानुसार बदल करण्याची तयारी कंपन्या करत आहेत. आता नवीन वर्षात 2025 मध्ये नवीन Mobile Phone खरेदीची योजना करत असाल तर तुम्हाला झटका बसू शकतो.
देशाने इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जगतात अमुलाग्र बदल केला आहे. आयफोन सारख्या कंपन्या भारतात दाखल झाल्या आहेत. आता भारताची सरकारी कंपनी BSNL चं 5G, 6G च्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपन्या पण नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. त्यात अद्ययावत तंत्रज्ञानाची भर आहे. जर तुम्ही पुढील वर्षात 2025 मध्ये नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. काऊंटरपॉईंट रिसर्चच्या मार्केट आऊटलुक अहवालानुसार, पुढील वर्षात स्मार्टफोन सरासरी 5 टक्क्यांनी महाग होऊ शकतो.
का वाढत आहेत किंमती?
Smartphone च्या किंमती का वाढत आहेत, असा सवाल अनेक जण विचारत आहेत. अत्याधुनिक कम्पोनेंट्समुळे किंमतीत वाढ होत आहे. तर येत्या काळात 5G तंत्रज्ञान येणार असल्याने कंपन्यांनी मोठे बदल केले आहेत. तर Generative AI हा मोबाईलमधील आवश्यक घटक झाला आहे. या तीन कारणांमुळे मोबाईलच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. एआय फीचर्ससाठी दमदार प्रोसेसरची गरज आहे. प्रोसेसरमुळे जास्त किंमत लागते. तर चांगल्या ग्राफिक्ससाठी प्रोसेसर तगडे असावे लागते. यामुळे किंमतीत वाढ झाली आहे. तर स्मार्टफोनमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर वाढला आहे. फोल्डेबल डिस्प्ले, जोरदार आणि दर्जेदार कॅमेरा सेन्सर, फास्ट चार्जिंगचा पर्याय यामुळे मोबाईलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
पुढील वर्षात किंमती वाढणार
काऊंटरपॉईंट रिसर्चच्या मार्केट आऊटलुक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, पुढील वर्षात स्मार्टफोन सरासरी 5 टक्क्यांनी महाग होऊ शकतो. अर्थात कंपन्यांना बजेट सेगमेंटमध्ये सुद्धा चांगले स्मार्टफोन उतरावे लागतील. पण मग त्यात ग्राहकांना तडजोड करावी लागेल. त्यांना अत्याधुनिक आणि दमदार फीचर्सला मुकावे लागेल. बजेट फोनमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा नसेल. तर मध्यम बजेट असणाऱ्या ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान मिळेल. तर फ्लॅगशिप मोबाईलमध्ये अत्याधुनिक फीचर्सची रेलचेल असेल. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करता येईल. पण त्यात अत्याधुनिक फीचर्ससाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील.