अनोळखी नंबरवरून फोन आल्यास व्हा सावध , फ्रॉड नंबर कसा ओळखाल ?
सध्या जगभरात ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी केली जाते. घरबसल्या तुम्हला ऑनलाइन शॉपिंग करता येते. डिजिटल माध्यमातून आपण अनेक गोष्टी करू लागलो आहोत. पण यात ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार देखील खूप वाढले आहेत. यात फसवणूक करणारे लोकं अनेकांना ऑनलाईन पद्धतीने खोट्या वेबसाईट किंवा कॉल करून याला बळी कसे पडतील याचा प्रयत्न करत असतात. यात ॲपच्या माध्यमातून नंबर जनरेट करून त्या नंबरवरून कॉल करून तुम्ही अडकू शकता. यामुळे तुमचे खातेही रिकामे होऊ शकते.
डिजिटल माध्यमातून व्यवहार करणे जितके सोपे आहे तितकेच घातक सुद्धा आहे. कारण सायबर गुन्हेगार रोज नव्या पद्धतीने फसवणूक करण्यासाठी तयार असतात. लोकांना फसवण्यासाठी काय बोलावे आणि कोणती पद्धत वापरावी हे त्यांना माहित आहे. सिमकार्ड खरेदी कठोर झाल्यापासून फसवणुकीचा नवा मार्गही या लोकांनी शोधून काढला आहे. आता फसवणूक करणारे लोकांना नव्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. फसवणूक करणारे ॲपच्या माध्यमातून नंबर तयार करत आहेत. हे आकडे भारतीय आकड्यांसारखे दिसतात. हा घोटाळा कसा होत आहे याचा संपूर्ण तपशील येथे वाचा. अशा नंबरवरून कॉल किंवा मेसेज आल्यास तक्रार करा.
फसवणुकीच्या पद्धती, त्या कशा टाळाव्यात
सायबर गुन्हेगार व्हीओआयपी कॉलसह ऍक्टिव्ह असतात, कोणतेही अज्ञात कॉल उचलण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यातच तुम्ही जर कॉल उचला तर समोर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका.
तुम्हाला जर अनोळखी नंबरने सतत कॉल येत असतील तर उचलू नका. खास करू जेव्हा तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असेल तर. तुम्हाला बळी पाडण्यासाठी +87,+86, +67,+69 या नंबरवरून कॉल केले जात असतात. हे सर्व भारतीय क्रमांकांसारखेच क्रमांक आहेत, ज्याचा वापर फसवणूक करणारे करत आहेत. भारतीय फोन नंबरची नेहमी +९१ पासून सुरुवात होते.
तुम्ही बनावट ऑनलाईन कंपनीला देखील बळी पडू शकता. कारण ऑनलाईन पद्धतीने बनावट वेबसाईट तयार करून नसलेल्या वस्तूंची कमी किमतीत ऑफर लावून ग्राहकांचे लक्ष वेधतात. या निमित्ताने हे फसवणूक करणारे लोकं बनावट पार्सल तुमच्या घरी पाठवा आणि तुम्ही ऑर्डर केल्यानुसार पैसे देण्यास भाग पडतात. इतकंच नाही तर अनेकदा टेलिकॉम विभागाला सांगून नंबर बंद करण्याची धमकीही दिली जाऊ शकते. त्यामुळे टेलिकॉम विभागाने ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारने लोकांना सतर्क राहण्याचे आणि संचार साथी पोर्टलवर अशा प्रकरणांची नोंद करण्यास सांगितले आहे.
येथे ऑनलाइन तक्रार करा.
तुमच्या सोबत ऑनलाइन घोटाळा झाला असेल तर त्याची तक्रार या सरकारी संकेतस्थळावर करा. यासाठी https://cybercrime.gov.in/ लिंकवर जा.
आपण आपले नाव उघड न करता देखील तक्रार करू शकता. तक्रार दाखल करण्याच्या पर्यायावर जा. अटी व शर्ती मान्य करा. इतर सायबर गुन्ह्यांची नोंद करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
सिटिझन लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा. येथे नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर सारखे तपशील भरा. रजिस्टर नंबरवर ओटीपी येईल, ओटीपी भरल्यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा. यानंतर ते सबमिट करा.
जनरल इन्फॉर्मेशन, सायबर क्राईम इन्फॉर्मेशन, व्हिक्टिम इन्फॉर्मेशन आणि प्रिव्ह्यू असे चार विभाग असतील, सर्व आवश्यक तपशील भरा.
सर्व तपशील तपासल्यानंतर सबमिट करा. प्रकरणाशी संबंधित स्क्रीनशॉट आणि फाईल्स अपलोड करा. सर्व डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
सायबर क्राईमसाठी चा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1930 आहे, त्यावर फोन करूनही तुम्ही तक्रार करू शकता.