Fake App | Tik Tok च्या फेक लिंक व्हायरल, सरकारकडून महत्त्वाचे आवाहन
केंद्र सरकारने Tik tok वर बंदी घातली आहे. याचा फायदा घेऊन सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली (Cyber Police Alert On Tik Tok Fake App) आहे.
मुंबई : केंद्र सरकारने Tik tok वर बंदी घातली (Cyber Police Alert On Tik Tok Fake App) आहे. तरीही अद्याप या अॅपच्या युजर्समध्ये किंवा चाहत्यांमध्ये घट झालेली नाही. याचा फायदा घेऊन सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली आहे. मात्र ही लिंक फेक असून असून त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने Tiktok सह अन्य 58 अँपवर बंदी घातली आहे. मात्र त्याचे असंख्य चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी उपरोक्त फेक लिंक बनवली आहे. त्याचा प्रसार व्हाट्सअँप मॅसेज आणि sms वर केला जातो. त्यानंतर तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते.
शासनाने #Tiktok वर बंदी घातली असली तरी या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर. याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली असून त्यापासून सावधानता बाळगावी- @MahaCyber1 चे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांचे आवाहन pic.twitter.com/GKRRdv7Kbk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 7, 2020
त्यामुळे महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की तुम्ही अशा कोणत्या मेसेजच्या लिंकवर क्लिक करु नये. अशा लिंकमध्ये Malware असू शकतो. त्यामुळे यापासून सावध राहा.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
तसेच केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी जे नियम आणि आदेश प्रसिद्ध करतील, त्याचे पालन करा. गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले (Cyber Police Alert On Tik Tok Fake App) आहे.
संबंधित बातम्या :
Chinese Apps | निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अॅप अखेर बंद
TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अॅप कसं झालं?