Dark Web: काय आहे डार्क वेब? इथे खरच मिळतात का बंदुक आणि रायफल?
तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की आपण फक्त 4 टक्के इंटरनेट सामग्री वापरतो, ज्याला सरफेस वेब म्हणतात.
मुंबई : डार्क वेब (Dark Web) हा इंटरनेटचा एक भाग आहे जिथे कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही प्रकारची कामे केली जातात. 96 टक्के इंटरनेट डीप वेब आणि डार्क वेब अंतर्गत येते. तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की आपण फक्त 4 टक्के इंटरनेट सामग्री वापरतो, ज्याला सरफेस वेब म्हणतात. डीप वेबवरील (Deep Web) सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी ई-मेल, नेट बँकिंग इत्यादीसह पासवर्ड आवश्यक आहे. टॉर ब्राउझरचा वापर डार्क वेब उघडण्यासाठी केला जातो. ड्रग्ज, शस्त्रे, पासवर्ड, चाइल्ड पॉर्न यासारख्या बंदी असलेल्या गोष्टी डार्क वेबवर आढळतात.
कसे काम करते डार्क वेब
डार्क वेब ओनियन राउटिंग तंत्रज्ञानावर काम करते. हे वापरकर्त्यांना त्यांची गोपनीयता राखण्यासाठी ट्रॅकिंग आणि पाळत ठेवण्यापासून संरक्षण करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, डार्क वेब अनेक आयपी ऍड्रेसमधून कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते, ज्यामुळे ट्रॅक करणे अशक्य होते.
येथे वापरकर्त्याची माहिती एनक्रिप्टेड आहे, जी डीकोड करणे अशक्य आहे. बिटकॉइन सारख्या आभासी चलनाचा वापर डार्क वेबवर व्यवहार करण्यासाठी केला जातो. असे घडते जेणेकरून व्यवहार शोधता येत नाही.
डार्क वेबवर होतात हे घोटाळे
डार्क वेबवर कॉन्ट्रॅक्ट किलिंगपासून शस्त्रास्त्रांच्या तस्करीपर्यंत अनेक बेकायदेशीर व्यव्हार होतात. डार्क वेबवर वापरकर्त्यांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील लीक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून प्रचंड पैसे लाटला जातो. डार्क वेबवर असे अनेक घोटाळेबाज आहेत, जे अत्यंत स्वस्तात बंदी असलेल्या वस्तू विकतात. तेथे स्वस्त फोन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. एकंदरीतच हे एक भयानक ऑनलाईन जग आहे. यापासुन लांब राहाणेच योग्य आहे.