Privacy भंग होत असल्यास WhatsApp डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट

WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीलाचा नवं गोपनीयता धोरण (Privacy Policy) सादर केलं आहे.

Privacy भंग होत असल्यास WhatsApp डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:01 PM

नवी दिल्ली : WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीलाचा नवं गोपनीयता धोरण (Privacy Policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, WhatsApp वरील मेसेजेस, चॅट्स व युजर्सचा डेटा आता सुरक्षित राहिलेला नाही. हा सर्व डेटा आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे WhatsApp विरोधात युजर्समध्ये तीव्र नाराजी आहे. (Delhi High Court hear on Whatsapp new Privacy Policy, says leave Whatsapp and move to another app)

दरम्यान, WhatsApp विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले आहे की, या प्रकरणावर तपशीलवार सुनावणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच कोर्टाने यावर म्हटले आहे की, WhatsApp हे एक खासगी अॅप आहे. जर तुम्हाला तुमच्या Privacy ची अधिक चिंता असेल तर तुम्ही WhatsApp वापरणं सोडून द्यायला हवं आणि इतर अॅप्स वापरणं सुरु करावं. ही एक ऐच्छिक गोष्ट आहे.

यासंदर्भात याचिका दाखल करताना याचिकाकर्त्याने मागणी केली होती की, WhatsApp मुळे लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. त्यामुळे सरकारने याविरोधात कडक पाऊल उचलायला हवं. कारण हे अॅप राज्यघटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. व्हॉट्सअ‍ॅप सामान्य नागरिकांशी संबंधित वैयक्तिक माहिती इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू इच्छित आहे, हे थांबवणे आवश्यक आहे.

WhatsApp ने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवं धोरण सादर केलं आहे. त्यानुसार कंपनी युजर्स जो कंटेंट WhatsApp वर शेअर करतोय, स्वीकारतोय (जो डेटा त्याच्यासोबत शेअर केला जातोय), युजर जो डेटा साठवून ठेवतोय, तो डेटा किंवा तो कंटेंट कंपनी वापरु शकते, शेअर करु शकते. कंपनीचं हे धोरण स्वीकारणं युजर्सना भाग आहे. कंपनीने या अटी-शर्तींखाली केवळ दोनच पर्याय दिले आहेत. कंपनीचं नवं धोरण म्हणजेच नव्या अटी-शर्ती स्वीकारा अथवा स्वीकारु नका (Accept or Reject). जर तुम्ही कंपनीच्या नव्या अटी मान्य केल्या नाहीत तर तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं.

हेही वाचा

WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी

WhatsApp चे एक पाऊल मागे, प्रायव्हसी अपडेट लांबणीवर, 8 फेब्रुवारीला काय होणार?

(Delhi High Court hear on Whatsapp new Privacy Policy, says leave Whatsapp and move to another app)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.