बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री

भारतीय नागरिकांकडून सातत्याने 'बॉयकॉट चायनीज प्रोडक्ट' असा नारा दिला जातोय. तरीसुद्धा चिनी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन विकत आहेत.

बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 11:43 AM

मुंबई : देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशात स्मार्टफोन बनवण्याच्या वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. तर त्यास लोक पाठिंबादेखील दर्शवत आहेत. भारतीय नागरिकांकडून सातत्याने ‘बॉयकॉट चायनीज प्रोडक्ट’ असा नारा दिला जातोय. तरीसुद्धा चिनी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन विकत आहेत. (despite boycott chinese in india still chinese companies sales mobiles in massive scale)

गेल्या महिन्याभरात देशभरात विक्री झालेल्या चिनी मोबाईलची आकडेवारी पाहता, देशात ‘बॉयकॉट चायनीज’ची नुसती ओरड सुरु आसल्याचे निदर्शनास येत आहे. देशभरात सध्याच्या घडीला शाओमी, रेडमी, रियलमी, वनप्लस, पोको, वीवो आणि ओप्पो या चिनी ब्रॅण्डसच्या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

भारतात रियलमी नारजो 20 सीरीजच्या 2.31 लाख मोबाईलची विक्री (realme narzo 20)

रियलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या नारजो 20 सीरीज या स्मार्टफोनने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार नारजो 20 सीरीजचे 2.31 लाख मोबाईल विकले गेले आहेत. 50 लाख भारतीयांना हा मोबाईल विकणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

तरुणांना नजरेसमोर ठेवून कंपनीने 23 सप्टेंबर रोजी नारजो 20 सीरीज फोन लाँच केला होता. या सीरीजमध्ये तीन फोन लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि मोठी बॅटरी ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

पहिल्याच सेलमध्ये 1.30 लाख Poco M2 मोबाईलची विक्री

भारतात चिनी फोनवरील बहिष्काराची हाक सातत्याने दिली जात आहे. त्यातच अजून एका चिनी कंपनीने भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. पोको एम 2 या मोबाईलच्या विक्रीसाठी कंपनीने 15 सप्टेंबर रोजी पहिल्या सेलचे आयोजन केले होते. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये 1.30 लाख पोको एम 2 या मोबाईल्सची विक्री झाली आहे.

या फोनचे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 64 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 10 हजार 999 रुपये तर 128 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 12 हजार 499 रुपये इतकी आहे.

दरम्यान रेडमीचा नोट 9 (Redmi Note 9) या फोनचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे हा फोन सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे.

संबंधित बातम्या 

अमेरिकी कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच, चार वर्षांची वॉरंटी, पाहा फीचर

Paytm Mini App store | थेट गुगलला आव्हान, पेटीएमचे नवे ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ लाँच!

(despite boycott chinese in india still chinese companies sales mobiles in massive scale)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.