WhatsApp चा आला कंटाळा? या सोप्या पद्धतीने खाते Delete करा

Delete WhatsApp | व्हॉट्सॲप हे डिजिटल जगतातील सर्वाधिक वापरण्यात येणारे मॅसेजिंग ॲप आहे. जगभरात कोट्यवधी लोक त्याचा रात्रंदिवस वापर करतात. व्हॉट्सॲपच्या नवनवीन फिचर्समुळे ते आता केवळ मॅसेजिंग ॲप उरले नाही. पण जर तुम्हाला व्हॉट्सॲपचा कंटाळा आला असेल तर हे मॅसेजिंग ॲप असे डिलीट करा.

WhatsApp चा आला कंटाळा? या सोप्या पद्धतीने खाते Delete करा
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 11:34 AM

नवी दिल्ली | 17 February 2024 : या डिजिटल जगतात, सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. काही घडामोड, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आता अगदी हाताळण्याजोगे प्लॅटफॉर्म हाती आले आहे. त्यात व्हॉट्सॲप हे सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग ॲप आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जगभरातील कोट्यावधी युझर्स या ॲपवर पडीक असतात. पण अनेकदा महत्वाची कामे, सुट्टी एन्जॉय करताना, अभ्यास करताना अथवा डिजिटल डिटॉक्ससाठी अनेकांन व्हॉट्सॲप बंद करायचे असते. तुम्ही पण व्हॉट्सॲपला कंटाळला असाल तर या सोप्या पद्धतीने ते डिलीट करता येते.

ही गोष्ट ठेवा लक्षात

  • व्हॉट्सॲप तुम्हाला डिलीट करायचे असेल तर सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. स्मार्टफोनवरुन व्हॉट्सॲप डिलीट केले म्हणजे झाले असे होत नाही. तुमच्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सॲप हटविण्यापूर्वी तुमचे खाते निष्क्रिय करणे आवश्यक आहे. तुम्ही जर केवळ स्मार्टफोनमधून व्हॉट्सॲप डिलीट केले तरी खाते मात्र सक्रिय असेल. तुमचे मित्र, ओळखीचे, नातेवाईक तुम्हाला मॅसेज पाठवू शकतील. पण ते मॅसेज तुम्हाला मिळणार नाहीत.
  • WhatsApp वरील तुमचे खाते हटविण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. कारण एकदा तुमचे खाते डिलिट झाले तर ते परत मिळविणे सोपे नाही. तुम्ही चुकून खाते डिलीट केले तर ते परत मिळवणे अवघड असल्याचे व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्ण विचारानेच हे खाते निष्क्रिय करा.

असे करा खाते डिलीट

हे सुद्धा वाचा
  • तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सॲप खाते उघडा
  • वरील उजव्या बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करा
  • Setting हा पर्याय निवडा. त्यातील Account वर क्लिक करा
  • त्यात Delete My Account वर जा, तुमचा मोबाईल क्रमांक टाका
  • हे खाते का डिलीट करत आहात, याचे कारण द्या, ते ड्रॉपबॉक्समध्ये दिसेल
  • आता डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा

व्हॉट्सॲप डिलीट झाल्यावर काय होते

व्हॉट्सॲप डिलीट झाल्यावर तुमची मॅसेज हिस्ट्री पुसल्या जाते. तुम्ही विविध व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर होता. तुमचे गुगल ड्राईव्ह बॅकअप पण डिलीट होते. तसेच एखाद्या चॅनलला जोडलेले असाल, एखाद्या चॅनलचे एडमिन असाल तर त्यातून बाहेर होता. तुम्ही खाते डिलीट केल्यानंतर तुमची माहिती पूर्णपणे डिलीट होण्यासाठी प्रक्रिया सुरु झाल्यापासून 30 दिवस लागत असल्याचा व्हॉट्सॲपचा दावा आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.