आधार कार्डवरील फोटो नाही पसंत, मग करा की असा अपडेट
Aadhaar Card | आधार कार्ड आजही अनेक ठिकाणी महत्वाचे आहे. तो महत्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्डमध्ये आता काही बदल तुम्ही घरबसल्या करु शकता. त्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडला नसेल तर तो बदलता येतो. काय करावे लागेल त्यासाठी? घ्या जाणून...
नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : आधार कार्ड एक महत्वाचा दस्तावेज आहे. आधार शिवाय आजही अनेक कामं पूर्ण होत नाही. बँकेत खाते उघडायचे असेल, शेअर बाजारात डिमॅट खाते उघडायचे असेल, शाळेत मुलांचा प्रवेश याच नाही तर अनेक ठिकाणी आधार कार्ड हा दस्तावेज मागितल्या जातो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते. अनेकदा आधार कार्डवर आपले छायाचित्र चांगले दिसत नाही. हे छायाचित्र आपल्याला बदलवता येते. त्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याआधारे तुम्ही आधार कार्डवरील फोटो बदलवू शकता.
हे बदल करा घरबसल्या
UIDAI नुसार, जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, ई-मेल आयडी हे बदलवायचे असतील तर त्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. ही कामे तुम्ही घरबसल्या UIDAI च्या संकेतस्थळावरुन करु शकता. पण जी कामे करण्यासाठी बायोमेट्रिकची गरज असते. त्याठिकाणी तुमच्या बोटांच्या ठशांची गरज असते. अशा कामांसाठी Aadhaar Seva Kendra वर जावे लागते.
फोटो घरबसल्या बदलता येतो?
Aadhaar Card वरील फोटो अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध नाही. म्हणजे तुम्हाला घरबसल्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागते. त्याठिकाणी काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आधार कार्डवरील फोटो बदलवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होते.
या स्टेप्स करा फॉलो
- UIDAI ची अधिकृत पोर्टल uidai.gov.in वर जा. त्यानंतर आधार नावनोदणी अर्ज डाऊनलोड करा
- हा अर्ज घरीच भरा. हा अर्ज भरल्यानंतर जवळच्याच आधार केंद्रावर जा
- आधार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या Biometric Details अपडेट केले जाईल
- नवीन फोटो अपडेट केल्यानंतर त्यासाठी काही शुल्क अदा करावे लागेल
- फोटो अपडेट करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक स्लिप मिळेल
- या स्लिपमध्ये तुम्हाला URN मिळेल. म्हणजे तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. त्याआधारे तुम्ही UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार अपडेट झाले की नाही, याची माहिती मिळेल.