अनोळखी नंबरला WhatsApp वर असे करा ब्लॉक, अशी सोपी आहे पद्धत

WhatsApp Spam Number | व्हॉट्सअपवर सुरक्षेच्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. पण तरीही सायबर भामटे काही ना काही ट्रिक शोधून काढतातच. त्यामुळे युझर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअपने अनेक सुविधा समोर आणल्या आहेत. आता एका नोटिफिकेशन आधारे पण तुम्ही फोन लॉक असताना पण स्पॅम नंबर ब्लॉक करु शकता.

अनोळखी नंबरला WhatsApp वर असे करा ब्लॉक, अशी सोपी आहे पद्धत
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 12:00 PM

नवी दिल्ली | 13 February 2024 : ऑनलाईन फसवणूकीचे आकडे काही कमी होताना दिसत नाही. रिपोर्टनुसार, अनोळखी क्रमांकावरुन येणारे कॉल आणि मॅसेज यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक जण लाखो रुपये गमवतात. सायबर भामट्यांचा अजून एक खास अड्डा, WhatsApp हे आहे. व्हॉट्सअप अनेक प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविते. पण तरीही अनेक लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतातच. त्यामुळे व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी खस सुरक्ष कवच आणले आहे. त्यानुसार, फोन लॉक असला तरी, नोटिफिकेशनच्या माध्यमातून युझर अशा अनोळखी माणसाचा नंबर ब्लॉक करु शकतात.

असे करा ब्लॉक

जर एखादा आमिष दाखविणारा, संशयास्पद मॅसेज आला आणि त्यात फसवणुकीचा संशय आला तर हा क्रमांक तुम्हाला झटपट ब्लॉक करता येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर, युझर्सला उत्तर देण्याच्या बटनाजवळच आता “ब्लॉक” बटनाची सुविधा देण्यात येणार आहे. तुमचा मोबाईलला स्क्रीन लॉक असला तरी नोटिफिकेशन मिळताच तुम्हाला हा अनोळखी क्रमांक लॉक करता येईल.

हे सुद्धा वाचा

का आणले नवीन फीचर

यापूर्वी WhatsApp ने ब्लॉक आणि रिपोर्टचा पर्याय दिला आहे. पण अनेकदा अनोळखी व्यक्तीकडून मॅसेज आल्यास त्याला ब्लॉक करण्यासाठी चॅट उघडावे लागत होते. पण अनेकदा मॅसेज वाचल्यावर युझर्स त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचे विसरुन जात होते. अथवा त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण आता नवीन फीचरमुळे युझर्सला थेट नोटिफिकेशन पाहूनच स्पॅम मॅसेज ब्लॉक करता येणार आहे. त्यासाठी फोनचे लॉक उघडण्याची गरज नाही.

हे पण फीचर्स

  1. टू-स्टेप व्हेरिफिकेशन : तुमचे WhatsApp हॅक होण्यापासून वाचविण्यासाठी 6 आकडी PIN चा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअप हॅक करण्याची संधी मिळत नाही.
  2. डिसअपेरिंग पर्याय : व्हॉट्सअप मॅसेजमध्ये छायाचित्र, व्हिडिओ, व्हाईस नोट्स पाहायचे नसेल अथवा जास्त होत असेल तर तुम्ही मॅसेज गायब होणाऱ्या डिसअपेरिंग हा पर्याय वापरु शकता.
  3. चॅट लॉक : तुम्ही तुमच्या चॅट्सला वेगळा पासवर्ड टाकून लॉक करु शकता. त्यामुळे तुमचा मोबाईल कोणी हाती घेतला तरी त्याला चॅट्स वाचता येत नाहीत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.