YouTube चॅनलद्वारे घरबसल्या कमाई करा, स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करा, या टिप्स फॉलो करा

आजकाल सर्वांच्या हातात स्मार्ट फोन आणि इतर गॅझेट आल्याने आपल्यालाही स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करता येते. युट्युब चॅनल आजकाल चांगली कमाई करण्याचा सोपा मार्ग बनला आहे. शिवाय युट्युब चॅनल सुरु करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र किंवा डिग्रीची गरज नाही. कोणीही ज्याच्याकडे चांगला कंटेंट आहे तो हे चॅनल सुरु करून पैसे कमावू शकतो. परंतू स्वत: चे युट्युब चॅनल सुरु करायचे असेल तर काही नियमांचे पालन करावे लागते. यासाठी काही टिप्स आपण पाहणार आहोत. त्याच्या मदतीने आपण आपले फॉलोअर्स वाढवून चॅनल वाढवू शकतो.

YouTube चॅनलद्वारे घरबसल्या कमाई करा, स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करा, या टिप्स फॉलो करा
YouTube Tips Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:01 PM

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : तुम्हाला जर स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करायचे असेल तर लवकरच तयारीला लागा. या युट्युब चॅनलमुळे तुम्हाला घर बसल्या या महागाईत कमाईचा नवा मार्ग मिळू शकतो. या युट्युब चॅनलसाठी काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे चॅनल वाढवू शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या युट्युबवर चॅनलवर कशा प्रकारचे कंटेट द्यायचे आहे हे निश्चित करावे लागेल. त्यानंतर आपल्याला चॅनलचे नाव काय ठेवायचे याचा विचार करावा लागेल. आपले टार्गेट ऑडीयन्स काय आहे ? याचा विचार केल्यानंतरच आपण आपल्या चॅनलचे योग्य नाव देऊ शकता. तर चला पाहूयात युट्युब चॅनल कसे सुरु करावे…

चॅनलचे नाव काय असावे ?

तुम्हाला जर स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करायचे असेल तर तुम्हाला आधी कोणत्या प्रकारचे कंटेट त्यावर द्यायचा आहे याचा आधी विचार करावा लागेल. जर तुम्हाला हा कंटेट दररोज द्यावा लागणार असल्याने त्याचा विचार करूनच त्या अनुसार विषयाची निवड करावी. तसेच आपल्या चॅनलच्या टार्गेट ऑडियन्सचा विचार करुन त्यानुसार चॅनलचे नाव आणि कंटेंटची तयारी करावी लागणार आहे. चॅनलवर ज्या प्रकारचा कंटेंट असेल त्याच प्रकारचे त्याचे नावही त्या कंटेटशी जुळणारे असायला हवे. चॅनलचे नाव तुम्ही तुमच्या सरनेम किंवा अन्य कंटेंटच्या अनुषंगाने निवडू शकता.

ठरलेल्या वेळी कंटेंट अपलोड करा

युट्युब चॅनल सुरु करताना आधी आपल्याकडे प्लानिंग हवी. चॅनलवर किती वेळेच्या अंतराने तुम्ही व्हिडीओ अपलोड करणार आहात. त्या संबंधीचे कंटेट तुमच्याकडे आधीच तयार असायला हवेत. युट्युब चॅनल सुरु करण्यासाठी चॅनलवर लागोपाठ अपडेट करण्यासाठी कंटेंट तयार असायला हवा. कारण ठरलेल्या निश्चित वेळी तुम्हाला तुमचा कंटेंट अपडेट करावा लागणार आहे.

शॉर्ट्सचा वापर करा

युट्युब चॅनलसाठी व्हिडीओ तयार करणे हे खूपच जिकरीचे आणि मेहनतीचे काम आहे. तसेच फार मोठा व्हिडीओ असेल तर प्रेक्षक असा व्हिडीओ न पाहणेच पसंत करतात. त्यामुळे चॅनलसाठी शॉर्ट्स देखील तयार करावा. शॉटर्सवर जादा व्ह्यूज आल्याने चॅनल ग्रो होण्याचे चान्स वाढतात.

प्रत्येक व्हिडीओतून नवीन शिका..

व्हिडीओ अपलोड केल्यानंतर आपले काम संपत नाही. चॅनल ग्रो करण्यासाठी आपल्या प्रत्येक व्हिडीओत काय चुका आहेत याचा अभ्यास करावा. आणि पुढील व्हिडीओत त्याप्रमाणे सुधारणा कराव्यात. प्रत्येक व्हिडीओ अपलोड केल्यानंतर पुढील व्हिडीओ आणखी परिपूर्ण आणि त्रूटी टाळणारा करण्याचा प्रयत्न करा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.