PDF फाईल करायची एडिट? मग वापरा हा भन्नाट फॉर्म्युला, वारंवार नाही तयार करावी लागणार नवीन पीडीएफ
PDF Editor : पीडीएफ फाईल एडिट कशी करायची? असा प्रश्न अनेकांना पडतो. पीडीएफ फाईल एडिट करण्यासाठी ऑनलाईन काही पीडीएफ एडिटर आहेत. त्याआधारे पीडीएफ फाईल तयार करता येईल. तुमच्या सोयीनुसार, त्यात बदल करता येईल. विशेष म्हणजे या सोयीसाठी कोणतेही पेड सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही.
अनेकदा आपल्याला पीडीएफ फाईल तयार करून शे्अर करावी लागते. जर PDF मध्ये काही गडबड असेल तर ती वेळोवेळी बदल करावा लागतो. तुम्ही या ट्रिक आ टिप्सच्या मदतीने काही मिनिटात ही अडचण दूर करु शकता. पीडीएफ फाईल एडिट करण्यासाठी ऑनलाईन काही पीडीएफ एडिटर आहेत. त्याआधारे पीडीएफ फाईल तयार करता येईल. तुमच्या सोयीनुसार, त्यात बदल करता येईल. तुम्हाला अनेकदा नवीन पीडीएफ फाईल पण तयार करावी लागणार नाही. एकाच फाईलमध्ये अनेकदा बदल करता येतील. विशेष म्हणजे या सोयीसाठी कोणतेही पेड सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही.
PDF file काय आहे?
PDF हा एक फाईल फॉर्मेट आहे. तो तुमच्या फाईलला एका पोर्टेबल फाईल जशी की टेक्स्ट फाईल, फोटोज, वर्ड डॉक्युमेंट इत्यादी Readable फाईलमध्ये बदलवू शकता. Convert करू शकता. यानंतर तुम्ही फाईल ही जगभरात त्याच स्वरुपात कुठे ही पाठवू शकता. ज्याठिकाणी पीडीएफ फाईल उघडण्यासाठी ॲप्लिकेशनची मदत मिळते, तिथे ही फाईल उघडते. त्या ठिकाणी तुम्ही पाठवलेली पीडीएफ फाईल सहज उघडते. ती वाचता येते. त्यासाठी अर्थातच त्या व्यक्तीकडे पीडीएफ रीडर सॉफ्टवेअरची गरज आहे. त्या सॉफ्टवेअरमध्येच तुम्हाला एडिटचा पर्याय पण मिळेल.
ऑनलाईन पीडीएफ एडिटर
तुमच्या पीडीएफ फाईलमध्ये अनेकदा बदल करण्यासाठी आणि ती एडिट करण्यासाठी तुम्हाला फार कसब पणाला लावण्याची गरज नाही. तुम्ही गुगलवर ऑनलाईन पीडीएफ एडीटर असे लिहून सर्च करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनसह पीडीएफ एडिट करण्याचा पर्याय मिळतो. तुम्ही थेट साईटवरून पीडीएफ एडिट करू शकतो. नाही तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि ॲप्पल स्टोरवर अनेक पर्याय मिळतात. तुम्ही साईट अथवा ॲपवर जाऊन एडिट करता येईल. पीडीएफ फाईल अपलोड करा आणि तुमच्या फाईलमध्ये चूक दुरुस्त करता येईल.
हे ॲप करतील मदत
PDF Text Editor : जर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करण्याचा पर्याय आहे. हे पीडीएफ एडिटर तुमच्यासाठी मदत करणारे ठरेल. गुगल प्ले स्टोअरमध्ये या ॲपला 4.2 स्टार रेटिंग मिळेल. या प्लॅटफॉर्मवरून 1 कोटींहून जास्त ॲप डाऊनलोड झाले आहे. या ॲपमधून तुम्ही टेक्स्टच नाही तर इमेज आणि पीडीएफ सुद्धा एडिट करू शकता.
Adobe Acrobat Reader : या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फोटो, टेक्स्ट अगदी सहजरित्या पीडीएफ फाईल एडिट करू शकता. तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. यामध्ये तुम्हाला काही फाईल्स सेव्ह, जतन करण्याचा पर्याय मिळतो. यामध्ये तुम्ही फाईल कंम्प्रेस करु शकू. या ॲप्लिकेशनशिवाय तुम्हाला इतर अनेक ॲप्सचा पर्याय उपलब्ध आहे. तु्म्ही या ॲपचे रिव्ह्यू आणि रेटिंग वाचून त्याचा वापर करू शकता.