मुंबई : एलोन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर बरेच बदल केले आहेत. ब्लू टिक ते इतर रंगाच्या टिकमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर एलोन मस्क ट्विटरवरही कायम सक्रिय असतात. मस्क यांनी ट्वीट टाकल्या टाकल्या त्यातून वेगळाच अर्थ काढला जातो. असंच एक एलोन मस्क यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये मस्क यांनी खुर्चीत बसलेल्या कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यानंतर एकापाठोपाठ एक ट्वीटर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.ट्वीट केलेल्या फोटोतील कुत्र्याने सीईओ लिहिलेलं टीशर्ट घातलं आहे. त्याचबरोबर कुत्र्यासमोर ट्विटर लोगो असलेले काही कागदंही ठेवली आहेत. पोस्टमध्ये ट्विटरला नवा सीईओ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.एलन मस्क यांचं ट्वीट माजी सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे. काही युजर्संनी याकडे लक्ष वेधलं आहे.
कुत्र्याचा फोटो शेअर करताना एलोन मस्क यांनी लिहिलं आहे की, ‘ट्विटरचा नवीन सीईओ खरंच खूप छान आहे.हा त्या पदासाठी परफेक्ट आहे. त्याची स्टाईलही भारी आहे.इतर लोकांपेक्षा नक्कीच चांगला आहे.’
He’s great with numbers! pic.twitter.com/auv5M1stUS
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
एलोन मस्क यांनी 44 बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटरचा ताबा एलोन मस्क यांच्याकडे आल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही जणांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता मस्क यांनी शिबा इनू कुत्र्याचा फोटो पोस्ट करत त्यांना डिवचल्याचं सांगितलं जात आहे.
ट्विटरचा ताबा एलोन मस्क यांच्याकडे जाण्यापूर्वी माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी एक पोस्ट लिहिली होती. ट्विटर बोर्डमध्ये मस्क यांचा समावेश केल्याने वेळेचा दुरुपयोग असं लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, “मी बोर्डात सहभागी होणार नाही. हा वेळेचा दुरुपयोग आहे.” मस्क यांनी माजी ट्विटर प्रमुख जॅक डॉर्सी यांना अग्रवाल यांच्याबाबत विचारलं होतं. तसेच चर्चेसाठी मेसेजही लिहिला होता. मात्र वाद आणखी विकोपाला गेला आणि अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला.एलन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल सुरु केला होता. त्यात युजर्संना विचारलं होतं की, सीईओ पद सोडायचं की नाही. त्यावर 57 टक्के युजर्संनी सीईओ पद सोडण्याच्या पक्षात मतदान केलं आहे. त्यानंतर नव्या सीईओचा शोध सुरु झाला होता.