Elon Musk : काय सांगता! प्रश्न तुमचा उत्तर एलन मस्कचं, नेमकं कसं ते जाणून घ्या!
गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अनेक बदल होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क यांनी अनेक बदल केले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अनेक बदल होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क यांनी अनेक बदल केले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे होते ते ट्विटर ब्लू, जे दरमहा पेमेंट भरून ब्लू टिक खरेदी करण्याची सुविधा सुरू केली आहे. अशाप्रकारचे अनेक बदल मस्क यांनी केले आहेत. तसंच आताही ट्विटरने एक नवीन घोषणा केली आहे. यामध्ये तुम्ही ट्विटर सबस्क्रिप्शनद्वारे एलन मस्क यांना कोणताही प्रश्न विचारू शकता.
आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सुपर फॉलो फीचरला सबस्क्रिप्शन म्हणून सादर करण्यात आले आहे. म्हणजेच, सदस्यांना एक्सक्लूसिव कंटेंटचा एक्सेस मिळेल. विशेष म्हणजे या फीचरद्वारे तुम्ही ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांना कोणताही प्रश्न विचारू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांनी सांगितलं की यूजर्स आता त्यांचा स्पेशल कंटेंट देण्यासाठी फॉलोअर्सकडून शुल्क आकारू शकतात. त्यामुळे ट्विटर यूजर्सना कमाई करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
यूजर्स मोठा मजकूर किंवा मोठा व्हिडिओ यासारख्या एक्सक्लूसिव्ह कंटेंटसाठी फॉलोअर्सकडून शुल्क आकारू शकतात. त्यावेळी, सब्सक्राइबर्सना वेगळ्या बॅजचा लाभ मिळेल. मस्क यांनी स्वतःचं सबस्क्रिप्शनही सुरू केलं आहे. जर तुम्ही त्याचे सदस्यत्व घेतल्यास, तुम्ही प्रत्येक महिन्यात 4 डॉलर (330 रुपये) देऊन मस्क यांना प्रश्न विचारू शकता.
ट्विटर युजर्सच्या कमाईत भाग घेणार नाही
अब्जाधीश व्यावसायिकाने माहिती दिली की, कंपनी पुढील 12 महिन्यांसाठी युजर्सच्या सबस्क्रिप्शन प्लॅनमधून शुल्क कापणार नाही. तसंच iOS आणि Android साठी, Apple आणि Google 30 टक्के शुल्क आकारतील.
या देशांमध्ये सबस्क्रिप्शन झालं सुरू
एलन मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली की, ही सबस्क्रिप्शन सेवा जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये जारी करण्यात आली आहे. यातून क्रिएटर्सना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे.
ट्विटरला फायदा होणार
युजर्ससाठी सबस्क्रिप्शन आणून, ट्विटरने कमाईचा एक नवीन मार्ग खुला केला आहे. यामुळे युजर्सची कमाई तर होईलच पण पुढे यातून ट्विटरलाही लाभ होणार आहे.