इलोन मस्कने उडवली WhatsApp ची झोप, लॉन्च करणार ही सुविधा

अब्जाधीश इलोन मस्क यांनी एक्सवर नवीन फिचर आणण्याची घोषणा करुन मेटाला टेंशनमध्ये आणले आहे. काय आहे ही भन्नाट सुविधा पाहा...

इलोन मस्कने उडवली WhatsApp ची झोप, लॉन्च करणार ही सुविधा
ELON MUSK Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 4:10 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : आपण ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलसाठी व्हॉट्सअपचा वापर करीत असतो. व्हिडीओ कॉलींगसाठी व्हॉट्सअपच सर्वात प्रसिद्ध आहे. परंतू आता अब्जाधीश इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या व्हॉट्सअपची जिरविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एक्सवर ( आधीचे ट्वीटर Twitter ) ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलची सोय उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी या नव्या आगामी सुविधेची घोषणा एक्सवरुन पोस्ट टाकून केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इलोन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करुन लिहीले आहे की , ‘ एक्सवर व्हिडीओ आणि ऑडीओ कॉल सेवा येत आहे. ही सुविधा आयओएस, एड्रॉईड, मॅक आणि पीसीवर काम करेल. यासाठी मोबाईल क्रमांकाची गरज लागणार नाही. त्यांनी पुढे लिहीलेय की एक्स इफेक्टीव्ह ग्लोबल एड्रेस बुक आहे. हा फॅक्टर्स एकदम युनिक आहे.

इलॉन मस्क यांची पोस्ट येथे पाहा –

फेसबुकस, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामशी पंगा

एक्सवर कॉलिंग फिचर आणण्याची घोषणा करुन इलॉन मस्क यांनी मेटाला टेंशनमध्ये आणले आहे. कारण ही सुविधा फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वर उपलब्ध होती. परंतू आता एक्सवर ही नवीन सुविधा सुरु होत आहे. इलॉन मस्क यांनी या फिचरबद्दल मागेही कल्पना दिली होती. त्यांनी पोस्ट करताना म्हटले होते की, ‘ लवकरच आम्ही व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलची सुविधा आणणार आहे. या सेवेद्वारे जगात कुठेही कॉल करता येईल. आणि विशेष म्हणजे या सेवेसाठी कोणत्याही मोबाईल नंबरची गरज लागणार नाही.’

डीझायनरने दिले होती हिंट

एक्सची डीझायनर एन्ड्रीया कॉनवे यांनी मागे यासंदर्भात हिंट देत सांगितले होते की एक्स प्लॅटफॉर्मवर लवकरच कॉलिंग फिचर येणार आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांनी ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहीले होते की, ‘एक्सवर आता कुणाला तरी कॉल केला.’

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.