Twitter : ट्विटरमधील दोन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी, कंपनीतील नियुक्त्यांवरही बंदी, ट्विटरमध्ये नेमकं काय चाललंय?

डिझाइन आणि अभियांत्रिकी विभागांचे नेतृत्व करणारे महाव्यवस्थापक कायवान बेकपौर आणि महसूल महाव्यवस्थापक ब्रूस फॉक हे दोघेही पद सोडत आहेत.

Twitter : ट्विटरमधील दोन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी, कंपनीतील नियुक्त्यांवरही बंदी, ट्विटरमध्ये नेमकं काय चाललंय?
एलन मस्कImage Credit source: Jnews
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 2:16 PM

मुंबई :  एलोन मस्कनं (elon musk) ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सतत चर्चेत असते. आता सीईओ पराग अग्रवाल (parag agrawal) यांनी कंपनीच्या दोन उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. यासोबतच कंपनीत नव्या नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरनं गुरुवारी पुष्टी केली की दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. संशोधन, डिझाइन आणि अभियांत्रिकी विभागांचे नेतृत्व करणारे महाव्यवस्थापक कायवान बेकपौर आणि महसूल महाव्यवस्थापक ब्रूस फॉक हे दोघेही पद सोडत आहेत. त्याचवेळी बेकपोर यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ‘सत्य हे आहे की मी ट्विटर सोडण्याची कल्पना कशी आणि केव्हा केली आणि तो माझा निर्णय नव्हता. मला कंपनीला वेगळ्या दिशेने घेऊन जायचे आहे, असं सांगून पराग यांनी जायला सांगितलं. त्यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

महाव्यवस्थापक कायवान बेकपौर यांचं ट्विट

फॉकनंही दुजोरा दिला

ट्विटरचे महसूल महाव्यवस्थापक ब्रूस फॉकन यांनीही ट्विटरमधून जाण्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. त्यांनी ट्विट केले , “गेल्या 5 वर्षांत ज्या संघांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले त्या सर्व संघांचे आभार मानण्यासाठी मला थोडा वेळ घ्यायचा होता. हे व्यवसाय तयार करणे आणि चालवणे हा एक सांघिक खेळ आहे.”

कंपनीतील नियुक्त्यांवरही बंदी

ट्विटरचे सीईओ अग्रवाल यांनी अधिकृत ईमेलमध्ये एका अहवालानुसार नोकरभरतीची कोणतीही नवीन योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, याक्षणी कोणतीही टाळेबंदी नाही, असा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. पराग अग्रवाल यांनी या उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकण्यामागे अनेक कारणे सांगितल्याचं कळतं. महसूल निर्माण करण्यात त्यांच्या अपयशाची चर्चा ईमेलमध्ये करण्यात आली आहें.

जुने कर्मचारी नाराज

इलॉन मस्क ट्विटरमध्ये कोणते बदल घडवून आणतील याची कोणालाच कल्पना नाही, परंतु संभाव्य बदलाची सर्वांनाच चिंता आहे कारण एलोन मस्क त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. द हॅरिस पोलच्या मते, मस्कने ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर 59 टक्के अमेरिकन आनंदी आहेत, तर सध्याच्या ट्विटर कर्मचार्‍यांना चिंता आहे की मस्क कंपनीमध्ये नाट्यमय बदल करू शकतात.

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.