जबरदस्त फीचर्ससह Realme X7 Pro चं एक्सट्रीम एडिशन लाँच, किंमत…

रियलमी एक्स 7 प्रो (Realme X7 Pro) या स्मार्टफोनचं एक्सट्रीम एडिशन (Realme X7 Pro Ultra) चीनमध्ये लाँच करण्यात आलं आहे.

जबरदस्त फीचर्ससह Realme X7 Pro चं एक्सट्रीम एडिशन लाँच, किंमत...
Realme X7 Pro Ultra
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 6:53 PM

मुंबई : रियलमी एक्स 7 प्रो (Realme X7 Pro) या स्मार्टफोनचं एक्सट्रीम एडिशन (Realme X7 Pro Ultra) चीनमध्ये लाँच करण्यात आलं आहे. हा फोन या सिरीजमधील लेटेस्ट व्हेरिएंट आहे. याआधी Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G हे दोन फोन लाँच करण्यात आले आहेत. हे दोन मॉडेल्स सप्टेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आले. (Extreme edition of Realme X7 Pro Ultra launched with amazing features)

नवीन Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशनमध्ये काही खास स्पेसिफिकेशन्स मिळतील. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, 360Hz टच सँपलिंग रेट, 90Hz रिफ्रेश रेट, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला Realme X7 Pro 5G, एक सिंगल 8GB + 128GB स्टोरेज मॉडलमध्ये सादर केला आहे आणि हा फोन क्वाड रियर कॅमेराने सुसज्ज आहे.

Realme X7 Pro Ultra एक्सट्रिम एडिशनचे स्पेसिफिकेशन

  • Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशन, Realme UI 2.0 वर आधारित आहे. हा फोन अँड्रॉईड 11 वर चालतो. यामध्ये 90Hz रिफ्रेशिंग रेटसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + AMOLED डिस्प्ले, 360Hz टच सँपलिंग रेट आणि 92.5 टक्के स्क्रीन आहे.
  • हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 1000+ SoC द्वारे संचालित आहे, जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजपर्यंतच्या पर्यायांसह उपलब्ध आहे.
  • Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये f / 1.8 लेंससह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, अल्ट्रा वाइड अँगल f / 2.25 लेंससह 8 मेगापिक्सल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलच्या मॅक्रो कॅमेराचा समावेश आहे.
  • Realme X7 Pro Ultra च्या फ्रंटला f / 2.5 अपर्चरसह 32-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशनवर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी आणि एका यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
  • हा फोन 65W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज अशा 4,500 mAh बॅटरीसह येतो. Realme X7 Pro Ultra चं डायमेंशन 159.9×73.4x.7.8 मिमी आणि वजन 170 ग्रॅम इतकं आहे.

Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशनची किंमत

Realme X7 Pro Ultra एक्सट्रीम एडिशनची किंमत चीनमध्ये 8GB + 128GB स्टोरेज मॉडलसाठी CNY 2,299 (जवळपास 25,600 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज पर्याय असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 2,599 (जवळपास 29,000 रुपये) इतकी आहे. Realme X7 Pro Ultra ब्लॅक फॉरेस्ट आणि कॅसल स्काय कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनच्या Realme ऑनलाइन स्टोरद्वारे खरेदी करता येईल. दरम्यान, हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

इतर बातम्या

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

(Extreme edition of Realme X7 Pro Ultra launched with amazing features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.