जगभरात फेसबुक-इंस्टाग्राम डाऊन
मुंबई : जगभरातील सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या युझर्सला बुधवारी रात्रीपासून अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फेसबुक अकाऊंट लॉग इन करण्यात अडचण येत आहे. तर काही युझर्सला लाईक किंवा कमेंट केल्यानंतर टेक्निकल एरर दाखवत आहे. बुधवारी रात्रीपासून ही समस्या सुरु झाली. मात्र, अद्यापही फेसबुक यावर तोडगा काढू शकलेला नाही. […]
मुंबई : जगभरातील सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या युझर्सला बुधवारी रात्रीपासून अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फेसबुक अकाऊंट लॉग इन करण्यात अडचण येत आहे. तर काही युझर्सला लाईक किंवा कमेंट केल्यानंतर टेक्निकल एरर दाखवत आहे. बुधवारी रात्रीपासून ही समस्या सुरु झाली. मात्र, अद्यापही फेसबुक यावर तोडगा काढू शकलेला नाही. त्यानंतर ट्विटरवर आज सकाळपासून #FacebookDown आणि #InstagramDown हे टॅग ट्रेंड होत आहेत.
We’re aware that some people are currently having trouble accessing the Facebook family of apps. We’re working to resolve the issue as soon as possible.
— Facebook (@facebook) March 13, 2019
अनेकांनी या समस्येबाबत ट्विटरवर फेसबुककडे तक्रार केली. त्यानंतर फेसबुकने ट्विटरवर याबाबत ट्वीट केले. “फेसबुक आणि इतर अॅपवर अॅक्सेस करण्यात समस्या उद्भवत असल्याची माहिती आम्हाला आहे. आम्ही या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे फेसबुकने म्हटलं. तर “हे अत्यंत निराशाजनक आहे. आमची टीम या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे”, असे ट्वीट इंस्टाग्रामने केलं.
We’re aware of an issue impacting people’s access to Instagram right now. We know this is frustrating, and our team is hard at work to resolve this ASAP.
— Instagram (@instagram) March 13, 2019
बुधवारी रात्री फेसबुकवर अनेक युझर्सला कमेंट किंवा लाईक केल्यानंतर रिअॅक्ट करण्याचं ऑप्शन येत होत. तर इंस्टाग्रामवर कुठलाही फोटो किंवा व्हिडीओ अपलोड होत नाहीये. युझर्स रात्रीपासूनच याबाबत ट्विटरवर तक्रार करत आहेत. अनेकांनी स्क्रिनशॉटही शेअर केले.
हॅकर्स अटॅकमुळे ही समस्या उद्भवलेली नाही, असे फेसबुकने स्पष्ट केलं. गेल्या 24 तासात टेक्नॉलॉजीमध्ये अडचण येण्याचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. मागील काही तासांत गुगलचे सर्व्हरही डाउन झाले होते.