Facebook Monthly Report : फेसबुकनं वादग्रस्त कंटेंट हटवला, भारतातील 1.75 कोटी पोस्टवर कारवाई, मासिक अहवाल जाणून घ्या…

गेल्या वर्षी मे महिन्यात लागू झालेल्या नवीन IT नियमांनुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मनं दरमहा अहवाल प्रकाशित करणं आवश्यक आहे. यामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कारवाईंचा समावेश असणार आहे. तर अशा पोस्टची माहिती देखील आहे जी सक्रिय असताना काढून टाकली गेली आहे किंवा थांबवली गेली आहे.

Facebook Monthly Report : फेसबुकनं वादग्रस्त कंटेंट हटवला, भारतातील 1.75 कोटी पोस्टवर कारवाई, मासिक अहवाल जाणून घ्या...
फेसबुकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 9:12 AM

मुंबई : फेसबुकनं (Facebook) भारतातील 1 कोटी 75 लाख पोस्टवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. फेसबुकनं आपल्या मासिक अहवालात (Monthly Report) याबाबत माहिती दिली आहे. मे महिन्यात फेसबुकनं भारतात 13 उल्लंघन श्रेणी अंतर्गत सुमारे 1 कोटी 75 लाख पोस्टवर कारवाई केली आहे. छळ, दबाव, हिंसा, प्रौढ, नग्नता आणि लैंगिक पोस्ट फेसबुकनं हटवल्या आहेत. अहवालानुसार, ज्या कंटेंटवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये छळ, बळजबरी, हिंसा, मुलांना धोक्यात आणणं यासारख्या श्रेणींचा समावेश आहे. फेसबुकनं 1 मे ते 31 मे 2022 पर्यंत ही कारवाई केली आहे. दुसरीकडे, मेटाचा दुसरा प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामनं (Instagram) याच कालावधीत 12 श्रेणींमध्ये सुमारे 41 लाख पोस्टवर कारवाई केली.

अहवालात काय आहे?

फेसबुकच्या मासिक अहवालानुसार, ‘कारवाई करण्यात आलेली सामग्री छळ, दबाव, हिंसा किंवा ग्राफिक सामग्री, प्रौढ नग्नता आणि लैंगिक क्रियाकलाप, मुलांना धोक्यात आणणारी, धोकादायक संस्था आणि व्यक्ती आणि स्पॅम अशा श्रेणींमध्ये येते. “कारवाई करणे म्हणजे Facebook किंवा Instagram वरून कोणतीही सामग्री काढून टाकणे किंवा झाकणे आणि काहींना त्रासदायक वाटणाऱ्या प्रतिमा आणि व्हिडिओंमध्ये चेतावणी जोडणे असा असू शकतो,’ असं अहवालात म्हटलंय.

इंस्टाग्रामनं किती पोस्टवर कारवाई केली?

भारतातील मे महिन्याच्या अहवालात सुमारे 41 लाख पोस्टवर कारवाई केली. अहवालात असं म्हटलंय आहे की 1 मे ते 31 मे 2022 दरम्यान फेसबुकनं विविध श्रेणींमध्ये 1.75 कोटी सामग्रीवर कारवाई केली आहे. तर मेटा इंस्टाग्रामच्या इतर प्लॅटफॉर्मनं सुमारे 41 लाख सामग्रीवर कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

अहवाल बंधनकारक

गेल्या वर्षी मे महिन्यात लागू झालेल्या नवीन IT नियमांनुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मनं दरमहा अहवाल प्रकाशित करणं आवश्यक आहे. यामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कारवाईंचा समावेश असणार आहे. तर अशा पोस्टची माहिती देखील आहे जी सक्रिय असताना काढून टाकली गेली आहे किंवा थांबवली गेली आहे.

ट्विटरकडून किती पोस्टवर कारवाई?

ट्विटरनं भारताच्या पारदर्शकता अहवालात जून 2022 नुसार देशात 26 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 दरम्यान 1 लाख500 हून अधिक तक्रारी आल्या. त्यात म्हटले आहे की मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 46 हजार 500 हून अधिक खाती बॅन करण्यात आली आहेत. हा डेटा भारतातून आलेल्या पोस्टसह जागतिक कृतीशी संबंधित असल्याचं म्हटलंय.

WhatsAppनं किती युजर्सवर कारवाई?

मेटा-मालकीच्या WhatsApp च्या अलीकडील अहवालात असं म्हटले आहे की, प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करत मे महिन्यात 19 लाखांहून अधिक भारतीय खाती बंदी केली गेली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.