फेसबूक आणणार नवा व्हिडीओ प्लॅटफॉर्म, सेलिब्रेटी,कंटेट क्रिएटर्ससोबत सेल्फी काढण्याची सोय
सुपर टूलचा वापर करुन लाईव्हस्ट्रीमदरम्यान पैसे देऊन क्रिएटर्ससोबत सेल्फी काढू शकतात. facebook super
वॉशिंग्टन : सोशल मीडिया कंपनी फेसबूक(Facebook) एक नवीन व्हिडीओ प्लॅटफॉर्म तयार करत आहे. नव्या प्लॅटफॉर्मवरुन लोकांना सेलिब्रेटी आणि कंटेट क्रिएटर्ससोबत लाईव्ह बातचीत करता येणार आहे. फेसबूककडून या प्लॅटफॉर्मला सुपर (Super) हे नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील वापरकर्ते आणि प्रेक्षक कंटेट क्रिएटर्सला डिजीटल गिफ्ट देऊ शकतात. सुपर टूलचा वापर करुन लाईव्हस्ट्रीमदरम्यान पैसे देऊन क्रिएटर्ससोबत सेल्फी काढू शकतात.(Facebook should be launch Super Video Platform soon)
फेसबूककडून या व्हिडीओ प्रॉडक्टबाबात अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मात्र, सुपर प्लटफॉर्मवरुन लाईव्हस्ट्रीममध्ये विक्रेते त्यांची उत्पादनं विकू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुपर प्लॅटफॉर्मची निर्मिती फेसबूकची एक्सपरिमेंटेशन टीम करत आहे.(Facebook should be launch Super Video Platform soon)
सुपर प्लॅटफॉर्म निर्मितीमागील कारण?
फेसबूककडून सुपर प्लॅटफॉर्म तयार करण्यामागे कोरोनाशी संबंधित कारण आहे. कोरोना काळात सेलिब्रेटी आणि त्यांचे चाहते यांना जोडण्यासाठी सुपरची निर्मिती करण्यात येणार आहे. सोमवारी फेसबूककडून Collab नावाचे एक अॅप लाँच करण्यात आले. हे अॅप टिकटॉक सारखे आहे. (Facebook should be launch Super Video Platform soon)
…तर फेसबूकला व्हाटसअॅप, इन्स्टाग्राम विकावे लागेल
सध्या फेसबूकवर एक मोठं संकट घोंगावतंय. कारण फेसबुकविरोधात अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राज्याने खटला दाखल केला आहे. फेसबुक कंपनी या खटल्यात पराभूत झाली तर कंपनीला त्यांच्या मालकीचे Whatsapp आणि Instagram विकावं लागेल. अमेरिकन राज्यांनी फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर आरोप केला आहे की, नव्या आणि तरुण स्पर्धकांना मार्केटमधील शर्यतीपासून दूर ठेवण्यासाठी फेसबुकने ‘बाय अॅन्ड ब्यूरी’ (Buy and Bury) धोरण वापरले आहे.
या अशा प्रकारच्या खटल्यांना सामोरी जाणारी फेसबुक ही दुसरी कंपनी ठरली आहे, यापूर्वी अमेरिकेत गुगलला अशा प्रकारच्या खटल्याला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने ऑक्टोबर महिन्यात गुगलविरोधात दावा दाखल केला होता. 1 ट्रिलियन डॉलर इतकी व्हॅल्यू असलेल्या गुगलवर लहान प्रतिस्पर्ध्यांना मार्केटमधून हटवण्यासाठी पैसा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Facebook should be launch Super Video Platform soon)
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल…https://t.co/hgKgshBUEG#OnlineMoneyTransfer #IFSCCode
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
संबंधित बातम्या:
एकाच वेळी 46 राज्यांचा फेसबुकविरोधात खटला, केस हरल्यास Instagram आणि Whatsapp विकावं लागेल
(Facebook should be launch Super Video Platform soon)