अरेरे.. फोनची बॅटरी लगेच होत्ये ढुस्स…? ही ॲप्स खातात तुमची बॅटरी, ‘या’ उपायांनी जास्त काळ चालेल बॅटरी

Battery Draining Apps : तुमच्या मोबाईलमधील काही ॲप्समुळे फोनची बॅटरी वेगाने संपू शकते. ती ॲप्स कोणती हे जाणून घेऊया.

अरेरे.. फोनची बॅटरी लगेच होत्ये ढुस्स...? ही ॲप्स खातात तुमची बॅटरी, 'या' उपायांनी जास्त काळ चालेल बॅटरी
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 7:56 AM

नवी दिल्ली : आजकाल सर्वजण स्मार्टफोन (smartphone) वापरत असतात. फोन पुन्हा पुन्हा चार्ज (charging) करायची वेळ येऊ नये यासाठी आपल्या फोनची बॅटरी (mobile battery) दीर्घकाळ चालणारी असावी, अशी प्रत्येक युजरची इच्छा असते. पण तुमची इच्छा नसतानाही फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे एकतर तुमचा फोन किंवा तुमच्या फोनची बॅटरी खराब झाली आहे.

दुसरं कारण म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये अशी अनेक ॲप्स (apps) असतात, जी बॅटरीचा सर्वाधिक वापर करतात, त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. आज आपण अशा काही ॲप्सबद्दल जाणून घेऊया, जे मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त वापरण्यासाठी ओळखले जातात.

रिसर्च फर्म pCloud ने नुकताच डेटा गोळा केला आहे, त्यामध्ये स्मार्टफोनमधील कोणते ॲप्स सर्वात जास्त बॅटरी वापरतात याची माहिती दिली आहे. आपल्या रोजच्या वापरातील अनेक ॲप्सचा त्यात समावेश आहे. तुम्हीसुद्धा ही ॲप्स वापरता का ते जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

1) Uber

2) Fitbit

3) Facebook

4) Skype

5) Instagram

6) Airbnb

7) Bumble

8) Tinder

9) WhatsApp

10) Snapchat

फोनमधील अशा ॲप्समुळे केवळ बॅटरीचा वापर वाढतो असे नाही तर इतर काही कारणांमुळे फोनची बॅटरी झपाट्याने कमी होते.

बॅटरी कमी होण्याचे असू शकते कारण

जर तुम्ही फोनमध्ये ब्लूटूथ, जीपीएस, हाय रिफ्रेश रेट, नेव्हिगेशनसाठी लोकेशन, व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी यूट्यूब इत्यादी वापरत असाल तर या गोष्टींमुळे फोनची बॅटरी पुन्हा पुन्हा संपू शकते. त्यामुळे फोन चार्ज करण्यासाठी वारंवार चार्ज करावा लागू शकतो.

मोबाईल चार्जिंग लावताना काय काळजी घ्यावी ?

– मोबाईल कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका. अनेकजण मोबाईल चार्जिंगला लावून झोपतात. त्यामुळे मोबाईल ओव्हरहिट अर्थात गरम होतो आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.

– मोबाईल नेहमी त्या कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करा. अन्य कंपनीचे चार्जर वापरल्यामुळे तुमचा फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो.

– मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करुनही बोलू नका. ते अत्यंत धोकादायक आहे. शिवाय चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणंही टाळा.

– चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल गरम होत असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकतं.

– मोबाईल संपूर्ण चार्ज झाल्यानंतर त्याचा चार्जर काढून ठेवा. मोबाईल 80 टक्के किंवा 90 टक्केच चार्ज आहे म्हणून तो दिवसभर चार्जिंगलाच लावून ठेवू नका.

– मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी, बॅटरी किमान 20 दिवसातून एकदा पूर्णत: डिस्चार्ज होऊ द्या. त्यानंतर पूर्ण चार्ज करा.

– आवश्यकता नसेल तेव्हा मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवा. उदाहरणार्थ झोपताना, किंवा मीटिंगमध्ये असाल तेव्हा. त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाया जाणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.