प्रतिक्षा संपली, अखेर मेड इन इंडिया FAU-G गेम लॉन्च
FAU-G गेमच्या टीझरमध्ये लडाख घाटीच्या गलवान खोऱ्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमधील लढा दाखवण्यात आला आहे.
मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज प्रजासत्ताक दिनी nCore गेम्सने FAU-G गेम लॉन्च केला आहे (FAU-G Game Launch). या गेमच्या लॉन्चिंगची माहिती कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवर जारी केली आहे. त्यासोबतच कंपनीने अक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये गेमच्या थीमबाबत सांगण्यात आलं आहे (FAU-G Game Launch).
FAU-G गेमच्या टीझरमध्ये लडाख घाटीच्या गलवान खोऱ्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमधील लढा दाखवण्यात आला आहे. या टीझरमध्ये भारतीय सैनिकांना शत्रूशी लढताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये काही टास्क दिले जातील. तुम्हाला तिथे जावं लागेल आणि दहशतवाद्यांशी भांडावं लागेल. हे तेच ठिकाण आहे जिथे भारतीय सेनेने अनेक ऑपरेशन केले आहेत. गेममध्ये युद्धासाठी गरजेचे असलेले सामान दिसतात. यामध्ये असॉल्ट रायफल, Meele शस्त्र इत्यादीचा सपोर्ट मिळेल.
Fight for your country. Protect our flag. Action game FAU-G takes you to the frontlines and beyond! Start your mission today. Jai Hind!
Download now: https://t.co/4TXd1F7g7J#HappyRepublicDay #FAUG #atmanirbharbharat@vishalgondal @akshaykumar @dayanidhimg @BharatKeVeer pic.twitter.com/8HA6ZilIsg
— nCORE Games (@nCore_games) January 26, 2021
FAU-G मध्ये मल्टी प्लेयर मोड असेल
FAU-G गेममध्ये तुम्हाला बॅटल रॉयल गेमप्ले मोड मिळणार नाही. पण, यामध्ये तुम्हाला मल्टी प्लेअर मोड मिळेल. या प्रकारच्या मल्टीप्लेअर मोडचा सपोर्ट PUBG Mobile, Fortnite आणि Call of Duty Mobile सारख्या गेम्समध्ये मिळतो (FAU-G Game Launch).
FAU-G कसा डाऊनलोड कराल?
FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.
2. FAU-G असं सर्च करा.
3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.
4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.
5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.
6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात (FAU-G Game Launch).
Face the enemy. Fight for your country. Protect Our Flag. India’s most anticipated action game, Fearless and United Guards: FAU-G takes you to the frontlines and beyond! Start your mission today. Download now: https://t.co/8cuWhoq2JJ#HappyRepublicDay #FAUG @BharatKeVeer pic.twitter.com/uH72H9W7TI
— Akshay Kumar (@akshaykumar) January 26, 2021
संबंधित बातम्या :
लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
लाँचिंगपूर्वीच FAU-G चा विक्रम, 40 लाखांहून अधिक युजर्सकडून गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन