PUBG ला टक्कर देण्यासाठी FAU-G गेम सज्ज, लाँचिंगची तारीख ठरली!
अभिनेता अक्षय कुमारने PUBG गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच होणार असल्याची घोषणा केली होती. (Fau-G Game Launching Date In India)
नवी दिल्ली : जगभरात PUBG हा गेम प्रचंड लोकप्रिय ठरला होता. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गेमची क्रेझ होती. मात्र केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅपवर बंदी घातली होती. यानंतर PUBG गेमच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. मात्र आता PUBG गेमला पर्याय म्हणून लवकरच FAU-G गेम लाँच केला जाणार आहे. (Fau-G Game Launching Date In India)
येत्या 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी FAU-G गेम लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे PUBG गेम खेळणाऱ्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे PUBG गेमला पर्याय म्हणून PUBG Mobile India हा गेमही लाँच करण्यात येणार होता. मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जवळपास चार महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने PUBG गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच होणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात हा गेम गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन दिला होता. विशेष म्हणजे या गेमच्या रजिस्ट्रेशनला फार मोठा प्रतिसाद मिळाला होता.
FAU-G गेमवर गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर अनेकांकडून हा गेम नेमका कधी लाँच होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर येत्या 26 जानेवारीला हा गेम लाँच केला जाणार आहे.
30 नोव्हेंबरपासून कंपनीकडून हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केले. अजूनही हजारो लोक रजिस्ट्रेशन करत आहेत.
बंगळूरतील nCORE Games या कंपनीने हा गेम डेव्हलप केला आहे. याच कंपनीने आता बहुप्रतिक्षित FAU-G हा गेम लाँच करण्याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. लाँच केल्यानंतर अँड्राईड युजर्सला हा गेम डाऊनलोड करता येणार आहे. मात्र अद्याप आयफोन युजर्सला हा गेम डाऊनलोड करता येणार का? याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
कसा आहे गेम प्ले?
गुगल प्ले स्टोअरवर कंपनीने गेमसोबत काही फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये सैनिक लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेशात लढाई सुरु असल्याचे दिसत आहे. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, FauG कमांडो अत्यंत धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील. गेम-प्ले भारतीय सैन्याशी संबंधित आहे, असं प्ले स्टोरवरील फोटोंवरुन वाटतंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल. (Fau-G Game Launching Date In India)
संबंधित बातम्या :
PUBG ला आता FAU-G चा पर्याय, अक्षय कुमारकडून मोठी घोषणा
पबजी फॅन्ससाठी खूशखबर! डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात PUBG Mobile India लाँच होण्याची शक्यता