Google प्ले स्टोरवर FAU-G ला निगेटिव्ह रिव्ह्यू, 4.7 स्टार्सवरुन 3.0 स्टार्सपर्यंत रेटिंग घसरलं

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या महिन्यात 26 जानेवारी रोजी nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला.

Google प्ले स्टोरवर FAU-G ला निगेटिव्ह रिव्ह्यू, 4.7 स्टार्सवरुन 3.0 स्टार्सपर्यंत रेटिंग घसरलं
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 9:26 PM

मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या महिन्यात 26 जानेवारी रोजी nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला. लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या गेमने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 24 तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल 1 मिलियन (10 लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला. आतापर्यंत 5 मिलियन्स (50 लाख) युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे. दरम्यान हा गेम लाँच झाल्यानंतर मोठ्या संख्येने युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला खरा परंतु त्यांचा आता चांगलाच हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. (FAU-G ratings suffer on Google Play Store after negative reviews from PUBG players and Gamers)

हा गेम युजर्सना आवडला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. युजर्स आणि पबजी प्लेयर्स (Pubg Players) या गेमला गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) निगेटिव्ह रिव्ह्यू (Negative Review) देत आहेत. या गेमला मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले आहेत, त्यामुळे या गेमचं गुगल प्ले स्टोरवरील रेटिंग घसरलं आहे. या गेमला सुरुवातीला 4.7 स्टार्स रेटिंग मिळालं होतं. परंतु आता या गेमला गुगल प्ले स्टोरवर सरासरी 3.0 स्टार्स रेटिंग मिळालं आहे. पबजी प्लेयर्सना हा गेम आवडलेला नाही. त्यामुळे त्यांनी या गेमला निगेटिव्ह रिव्ह्यू दिलेत सोबत त्याला 1 स्टार मार्क केलं आहे.

एका गेमरने या गेमच्या रिव्ह्यूमध्ये लिहिलं आहे की, “पबजीसोबत या गेमची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण हे सगळं खोटं आहे, या गेममध्ये पबजीच्या तोडीस तोड असं काहीच नाही. या गेममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स नाहीत, विशिष्ट पॉवर नाही. यामध्ये केवळ हेड टू हेड फायटिंग आहे. हा गेम बनवणाऱ्यांनी या गेमच्या ग्राफिक्सवर चांगलं काम केलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही गेम खेळताना वळता (धावताना टर्न घेता) तेव्हा गेम मध्येच अडकतो. हा गेम सध्या अपूर्ण आहे. हा गेम डेव्हलप व्हायला वेळ लागेल. यामधील सिंगल प्लेअर मोड खूपच वाईट आहे, विचार करा याचा मल्टीप्लेवर मोड कसा असेल? मला तर आता या गेमकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत.”

कसा आहे FAU-G गेम?

FAU-G गेमच्या टीझरमध्ये लडाख घाटीच्या गलवान खोऱ्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमधील लढा दाखवण्यात आला आहे. या टीझरमध्ये भारतीय सैनिकांना शत्रूशी लढताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये काही टास्क दिले जातील. तुम्हाला तिथे जावं लागेल आणि दहशतवाद्यांशी भिडावं लागेल. हे तेच ठिकाण आहे जिथे भारतीय सेनेने अनेक ऑपरेशन केले आहेत. गेममध्ये युद्धासाठी गरजेचे असलेले सामान दिसत आहे. यामध्ये असॉल्ट रायफलसह अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहायला मिळत आहेत.

iOS युजर्सना वाट पाहावी लागणार

FAU-G हा गेम सध्या केवळ गुगल प्ले स्टोरवरच उपलब्ध आहे. त्यामुळे iOS युजर्सना या गेमसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा गेम iOS युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे किंवा नाही, किंवा तो कधी उपलब्ध होईल, याबाबत iOS ने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. तसेच हा गेम सर्वच अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध नाही. अँड्रॉयड युजर्सना या गोष्टीची माहिती असायला हवी की, हा गेम सध्या केवळ अँड्रॉयड 8 च्या पुढील व्हर्जन्ससाठी उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे 3-4 वर्ष किंवा त्याहून जुना फोन असेल तर हा गेम तुमच्या फोनवर खेळता येणार नाही.

केवळ एकाच मोडवर गेम खेळता येणार

सध्या हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येणार आहे. याचाच अर्थ पूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. सध्या या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे, आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये अधिक स्पेसची गरज

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये किमान 460 एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हाला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असं सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

गुगल प्ले स्टोरवरुन बनावट FauG गेम्स हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

हेही वाचा

FAU-G | 24 तासांत 10 लाख डाऊनलोड्स, गेम इन्स्टॉल करण्यापूर्वी या बाबी जाणून घ्या

लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

PUBG Mobile India आज भारतात लाँच होणार?

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

(FAU-G ratings suffer on Google Play Store after negative reviews from PUBG players and Gamers)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.