Smart Watch Under 3000 : 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, ब्ल्यू टूथ कॉलिंगसह अनेक फीचर्स उपलब्ध
फिटशॉट कनेक्ट या नव्या स्मार्टवॉचमध्ये 1.85 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून तो सोलोसिंक टेक्नॉलॉजी सह येतो. या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक वॉच फेस आणि ब्ल्यू टूथ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. हेडफोन्सपासून घड्याळापर्यंत सर्व गोष्टी आता डिजीटल (digital)झाल्या आहेत. सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन्सची चलती आहे. भारतीय बाजारात नुकतीच फिटशॉट या नव्या ब्रँडची एन्ट्री झाली असून त्यांनी नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचचे नाव फिटशॉट कनेक्ट (FitShot Connect smartwatch) असे आहे. या स्मार्टवॉचचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये 1.85 इंचांचा डिस्प्ले देण्यात (1.85 inch display) आला असून तो सोलोसिंक टेक्नॉलॉजी सह येतो. त्याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये सिंगल चार्जिंगमध्ये सात दिवसांचा बॅटरी बॅकअप, 100 हून अधिक वॉच फेस ही लेटेस्ट फीचर्सही (many latest features) देण्यात आली आहेत. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची (Bluetooth calling) सुविधाही देण्यात आली असून त्याच्या मदतीने युजर्स स्मार्टवॉचद्वारेच आलेला कॉल घेऊ शकतात किंवा डिसकनेक्टही करू शकतात.
फिटशॉट (FitShot) ही एक लाइफ स्टाइल इलेक्ट्रॉनिक निर्माती कंपनी आहे आणि या स्मार्टवॉचमधील फीचर्समुळे अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होतील, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.85 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून तो 500 निट्स पीक ब्राइटनेस सह येतो. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रखर सूर्यप्रकाशातही हा डिस्प्ले नीट बघता येतो. त्यासह या स्मार्टवॉचमध्ये हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल मोजण्याचे फीचर्सही उपलब्ध आहेत. ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल मोजण्यासाठी या स्मार्टवॉचमध्ये एसपीओ2 सेन्सर देण्यात आला आहे.
कशी आहे FitShot Connect ची बॅटरी ?
फिटशॉट कनेक्ट या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स आणि 300 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत नॉन-स्टॉप बॅकअप मिळते, असा दावा कंपनीद्वारे करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचे फीचरही दिले असून, ब्लूटूथच्या माध्यमातून ते स्मार्टफोनशी जोडले जाते.
किती आहे FitShot Smartwatch ची किंमत ?
फिटशॉटच्या या नुकत्याच लॉंच झालेल्या स्मार्टवॉचची (FitShot Smartwatch) किंमत 2999 रुपये इतकी आहे. 12 ऑगस्टपासून हे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध असेल. काळा, हिरवा आणि निळा, अशा तीन रंगांमध्य हे स्मार्टवॉच उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हे स्मार्टवॉॉच खरेदीसाठी उपलब्ध असेल.