सेकंडहॅण्ड एसी विकत घेताना या चुका टाळा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका!
एप्रिल महिना सुरू होताच उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागतो. अशा परिस्थितीत घरात थंडावा मिळावा म्हणून अनेकजण एसी बसवण्याचा विचार करतात. मात्र, नवीन एसीची किंमत सर्वांनाच परवडणारी नसल्यामुळे अनेकजण सेकंडहॅण्ड एसी घेण्याचा पर्याय निवडतात.

एप्रिल महिना सुरू होताच उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागतो. अशा परिस्थितीत घरात थंडावा मिळावा म्हणून अनेकजण एसी बसवण्याचा विचार करतात. मात्र, नवीन एसीची किंमत सर्वांनाच परवडणारी नसल्यामुळे अनेकजण सेकंडहॅण्ड एसी घेण्याचा पर्याय निवडतात.
परंतु, योग्य माहिती न घेता सेकंडहॅण्ड एसी खरेदी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची आणि आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे एसी घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. खालील पाच प्रश्न विचारल्यास तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि भविष्यातील अडचणींपासून स्वतःचा बचाव करू शकता.
1. शेवटची सर्व्हिसिंग कधी झाली?
सेकंडहॅण्ड एसी विकत घेताना तो नवीन आहे की पूर्वी वापरलेला, याची खात्री करा. जर तो पूर्वी वापरलेला असेल, तर त्याची शेवटची साफसफाई व सर्व्हिसिंग कधी झाली हे विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नका. स्वच्छता नसल्यास बॅक्टेरिया आणि धुळीमुळे ॲलर्जी, सर्दी, आणि श्वसनाच्या तक्रारी वाढू शकतात.
2. किती स्टार रेटिंग आहे?
वीज बचतीसाठी किमान ४-स्टार किंवा ५-स्टार रेटिंग असलेला एसी निवडावा. इन्व्हर्टर एसी अधिक कार्यक्षम असतो आणि वीजेचा वापर कमी करतो. ३-स्टार किंवा त्याखालचा एसी जास्त बिल आणतो आणि कूलिंगची कार्यक्षमता कमी असते.
3. योग्य प्रकारे एसीची बसवणूक झाली आहे का?
अयोग्य इंस्टॉलेशनमुळे गॅस गळती, गरम हवा बाहेर न जाणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनुभव असलेल्या प्रमाणित तंत्रज्ञाकडूनच एसी बसवून घ्या. आउटडोअर युनिट योग्य ठिकाणी आणि उंचीवर असणे गरजेचे आहे.
4. वायरिंग सुरक्षित आहे का?
फायरप्रूफ व दर्जेदार वायरिंग असलेला एसी निवडणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. कमी दर्जाच्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट, आग लागणे यासारखे अपघात होऊ शकतात. मुख्य स्विच आणि सर्किट ब्रेकर इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या.
5. व्होल्टेज अपडाऊनसाठी स्टॅबिलायझरची गरज आहे का?
जिथे व्होल्टेज अपडाऊन जास्त होते, तिथे स्टॅबिलायझर अत्यावश्यक आहे. विशेषतः नॉन-इन्व्हर्टर एसीसाठी स्टॅबिलायझर आवश्यक असून तो एसीचे लाईफ वाढवतो आणि अपघात टाळतो.
सुविधा आणि किफायतशीर पर्याय म्हणून सेकंडहॅण्ड किंवा भाड्याने एसी घेणं योग्य असलं तरी योग्य माहिती आणि काळजी न घेतल्यास ते महागात पडू शकतं. त्यामुळे या ५ प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच निर्णय घ्या आणि स्वतःसोबतच आपल्या कुटुंबियांचंही संरक्षण करा.