Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची अखेरची संधी

मोटोरोलाने (Motorola) शुक्रवारी त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. (Flipkart Big Savings Days sale 2021)

Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची अखेरची संधी
Moto G60-Moto G40
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 10:13 AM

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यापासून त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी (flipkart big billion days 2021) आहे, हा सेल 2 मेपासून सुरू झाला आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या (Moto) टॉप स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये मोटो जी 40 फ्यूजन (Moto G40 Fusion) आणि मोटो जी 60 (Moto G60) या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. विक्री दरम्यान, ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सूट मिळेल. (Flipkart Big Savings Days sale: last chance to get Discount on motorola phones)

मोटोरोलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनला उत्कृष्ट फीचर्ससह अपग्रेड करायला हवं. यात कॅमेरा सिस्टम, वेगवान प्रोसेसर, लाँग बॅटरी, स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आणि अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व फीचर्ससह, ग्राहक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन निवडू शकतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट सेलदरम्यान दिल्या जाणाऱ्या बेस्ट डील्स ग्राहकांनी मिस करु नये.

G10 Power, E7 Power वर मोठा डिस्काऊंट

मोटोरोलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) हा स्मार्टफोन 8099 रुपयात खरेदी करू शकता. त्याच वेळी, मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) 6299 रुपयांमध्ये बँक ऑफरसह खरेदी करता येईल. मोटो जी 60 हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पण ही ऑफर ग्राहक जेव्हा एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहाराच्या सहाय्याने फोन खरेदी करतील तेव्हाच उपलब्ध असेल. तर जी 40 फ्यूजन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो, म्हणजेच 12,999 रुपये या किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Razr 5G फोल्डेबल फोनवर 21 हजारांचा डिस्काऊंट

ग्राहक या सेलमध्ये फोल्डेबल फोन देखील स्वस्तात खरेदी करु शकतात. जो मोटो रेजर 5 जी या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये हा फोन 88,999 रुपये इतक्या किंमतीसह उपलब्ध आहे. आपण हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक ऑफरसह खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 1,09,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचं बेस मॉडेल 53,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत 74,999 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे.

रियलमी, सॅसमंगच्या स्मार्टफोन्सवर सूट

फ्लिपकार्टच्या लेटेस्ट ऑनलाइन सेलमध्ये इतर स्मार्टफोन ब्रँडवरही बर्‍याच ऑफर्स मिळतील. म्हणजेच, आपण रियलमी नार्झो 30 ए हा स्मार्टफोन 7,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्याच वेळी, सॅमसंग गॅलेक्सी F62 ची प्रारंभिक किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर रियलमी C25 आणि रियलमी C21 9,499 आणि 7249 रुपयांच्या या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण डिजिटल कॅमेरे, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉचदेखील खरेदी करू शकता.

इतर बातम्या

लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई

POCO M3 5G स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, शानदार कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळणार

Realme च्या सर्वात स्वस्त 5G फोनचा आज पहिला सेल, 8GB/128GB सह ढासू फीचर्स मिळणार

(Flipkart Big Savings Days sale: last chance to get Discount on motorola phones)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.