फिल्पकार्टवर बंपर डिस्काऊंट, ‘हे’ आठ फोन स्वस्त
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर येत्या 15 मे पासून बिग शॉपिंग डे सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, होम फर्नीचर आणि फॅशन प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लससोबत जोडलेल्या ग्राहकांसाठी 14 मे रात्री 8 वाजल्यापासून हा सेल सुरु झालेला असेल. फ्लिपकार्टवर हा सेल 19 मे पर्यंत असेल. तसेच एचडीएफसी डेबिट […]
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर येत्या 15 मे पासून बिग शॉपिंग डे सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, होम फर्नीचर आणि फॅशन प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लससोबत जोडलेल्या ग्राहकांसाठी 14 मे रात्री 8 वाजल्यापासून हा सेल सुरु झालेला असेल. फ्लिपकार्टवर हा सेल 19 मे पर्यंत असेल. तसेच एचडीएफसी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल.
स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये कंपनीने आतापर्यंतची सर्वात कमी किंमत ऑफर केली आहे. 4GB आणि 64GB स्टोअरेजवाल्या Samsung Galaxy J9 फोन फक्त 9 हजार 490 रुपयात मिळत आहे.
कॅमेराचे शॉकिन असलेल्या ग्राहकांना 4GB आणि 64GB चा स्मार्टफोन Redme Note 7 हा 11 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर Redme 6 सेलच्या दरम्यान, 6 हजार 999 रुपयात मिळणार आहे.
फ्लिपकार्टमध्ये सेल दरम्यान Nokia 5.1 Plus साठी तुम्हाला फक्त 7 हजार 999 रुपये द्यावे लागणार. या फोनची किंमत 13 हजार 199 रुपये आहे.
जर बजेट कमी असेल, तर Realme C1 खरेदी करु शकता. सेलच्या दरम्यान या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.
या सेलमध्ये Asus max pro M1 4GB आणि 64GB चा फोन सर्वात कमी किंमतीत विकणार असल्याचा दावा केला आहे. हा स्मार्टफोन 8 हजार 999 रुपयात विकला जाणार आहे.
जर तुम्हाला Honor चा फोन खरेदी करायचा आहे, तर फ्लिपकार्टवर सेल दरम्यान, पुढील 4 दिवसापर्यंत म्हणजे 19 मे पर्यंत Honor 10lite ला 12 हजार 999 रुपयापर्यंत खरेदी करु शकतात. कंपनी यावर 4 हजारांची सूट देत आहे.
Oppo a3s 4GB आणि 64GB चा फोन सेलमध्ये 9 हजार 990 रुपयात मिळणार आहे. या फोनची किंमत 13 हजार 990 रुपये आहे.
infinix Note 5 फोन ग्राहक 15 मे ते 19 मे दरम्यान 8 हजार 999 रुपयात खरेदी करु शकतात. सेल्फी प्रेमींसाठी हा फोन फायदेशीर ठरु शकतो.