Flipkart Sale : रियलमी, आयफोन आणि मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट

फेस्टिव्हल सेलनंतर आता फ्लिपकार्ट कंपनीने पुन्हा एकादा ग्राहकांसाठी मोबाईल बोनांजा सेलचे आयोजन केले आहे.

Flipkart Sale : रियलमी, आयफोन आणि मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:25 PM

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी प्लिपकार्टने नुकताच त्यांचा फेस्टिव्हल सेल संपवला. या सेलमध्ये लाखो मोबाईल्सची विक्री झाली. लॉकडाऊनमध्ये बाजार कोलमडल्याचे बोलले जात होते. परंतु दिवाळीपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांनी विकलेल्या मोबाईल्सच्या आकडेवारीकडे पाहिल्यास लक्षात येतं की, कोरोना संसर्गाचा, लॉकडाऊनचा स्मार्टफोनच्या विक्रीवर कोणताही परिणामा झाला नाही, उलट त्यामध्ये काही प्रमाणात वृद्धी दिसून आली. (Flipkart Mobile Bonanza Sale 2020 : Best deals on Realme 6, iPhone XR, Micromax In note 1 and more)

फेस्टिव्हल सेलनंतर आता फ्लिपकार्ट कंपनीने पुन्हा एकादा ग्राहकांसाठी मोबाईल बोनांजा सेलचे (Mobile Bonanza Sale 2020) आयोजन केले आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट कंपनी 1 हजार 750 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट देणार आहे. परंतु या ऑफर्स क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. या ऑफर्स ईएमआय ट्रान्जॅक्शन्सवर उपलब्ध आहेत. या सेलमध्ये तुम्ही रियलमी सी 3, रियलमी 6, आयफोन XR, मायक्रोमॅक्स इन नोट 1 आणि इतर स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळवू शकता.

रियलमी C3 (Realme C3)

रियलमी C3 या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे, हा फोन एक्सचेंज ऑफरवर 8400 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला 6.52 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि मीडियाटेक हीलियो G70 प्रोसेसरही मिळेल.

मायक्रोमॅक्स इन नोट 1 (Micromax In Note 1)

मायक्रोमॅक्स इन नोट 1 हा स्मार्टफोन भारतात 10,999 रुपये या किंमतीत विकला जातोय. परंतु जर तुमच्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला या फोनवर 1 हजार 750 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 9 हजार 249 रुपयांमध्ये हा फोन तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.

रियलमी 6 (Realme 6)

फ्लिपकार्ट सेलमध्ये रियलमी 6 हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले, 30W चा फास्ट चार्ज सपोर्ट, 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.

आयफोन XR (Apple Iphone XR)

आयफोन XR हा फोन तुम्ही सध्या 40,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकता. या किंमतीत तुम्हाला 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेलं व्हेरियंट मिळेल. या फोनच्या 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 45,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचांचा लिक्विड रेटिना HD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत

ना 100, ना 200, सॅमसंग आणणार तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, व्हिडीओ रेकॉर्डिंगची क्वालिटीही भन्नाट

Micromax चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 10 डिसेंबरपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Flipkart Mobile Bonanza Sale 2020 : Best deals on Realme 6, iPhone XR, Micromax In note 1 and more)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.