मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह झाला आहे, जो 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रियलमी (Realme), रेडमी (Redmi) आणि मोटोरोला (Motorola), शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या कंपन्यांचे अनेक फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना फ्लिपकार्टने दिली आहे. तसेच या सेलमध्ये तसेच आयफोन 11, आयफोन XR आणि आयफोन SE वर देखील डिस्काऊंट देण्यात आला आहे. (Flipkart Mobile Bonanza Sale : Up to Rs 8000 discount on 10 smartphones of Asus, Apple, Redmi, Realme)
फ्लिपकार्टने स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट दिला आहेच, यासोबतच ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज आणि इतर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही डिस्काऊंटेड किंमतीसह अधिक डिस्काऊंट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यासाठी कोणती डील परफेक्ट आहे.
हा फोन कंपनीने नुकताच 9999 रुपये इतक्या किंमतीसह लाँच केला होता. आता या फोनवर कंपनीने 500 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. या फोनची मूळ किंमत 9499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
तुमचं बजेट जर कमी असेल तर Realme C11 हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 6,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये कंपनीने 2GB RAM आणि 32GB स्टोरेज स्पेस दिली आहे. याची मेमरी मायक्रोस एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याच्या रियर पॅनलवर 13MP+5MP डुअल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनची मूळ किंमत 9999 रुपये इतकी आहे. मात्र हा फोन तुम्ही 8,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येईल. सोबतच यामध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी, 13MP + 2MP चा डुअल कॅमेरा, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन तुम्ही 9,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. Redmi 9 Prime मध्ये तुम्हाला 4GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस मिळेल. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल. तसेच यामध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5020 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
रियलमी X7 प्रो या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्यावर तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. ही ऑफर 7 एप्रिल ते 1 एप्रिलपर्यंत वैध आहे.
जियोनी मॅक्स (Gionee Max) हा स्मार्टफोन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवा आहे. हा स्मार्टफोन 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 6.1 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, सोबत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह ऑक्टा-कोर प्रोसेसरदेखील आहे. हा हँडसेट 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आला आहे.
फ्लिपकार्ट वर असुस आरओजी फोन 3 (ASUS ROG Phone 3) 41,999 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन खास गेमर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 49,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच केला होता.
पोको एक्स 3 (Poco X3) फ्लिपकार्टवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सध्याच्या सेलमध्ये फोनवर 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. यात 6000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 732 SoC आणि 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
अॅपल स्टोरमध्ये आयफोन 11 ची किंमत 54 हजार 900 रुपये इतकी आहे. परंतु या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 46,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ई-कॉमर्स जायंट या सेलमध्ये आयफोन 11 वर थेट 8000 रुपयांची सूट देत आहे. तसेच जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळू शकते.
मोबाइल बोनान्झा सेलमध्ये तुम्ही iPhone 11 Pro हा स्मार्टफोन 74,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 5.8 इंचांचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा, A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
Flipkart TV Days : बंपर डिस्काऊंटसह MI, Samsung, LG कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी
64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Samsung चा स्मार्टफोन लाँच
(Flipkart Mobile Bonanza Sale : Up to Rs 8000 discount on 10 smartphones of Asus, Apple, Redmi, Realme)