युझर्ससाठी फोल्डेबल iPhone! Apple चा प्लॅन तरी काय, जाणून घ्या
Foldable iPhone | बाजारात सध्या फोल्डेबल स्मार्टफोनला पण प्रतिसाद मिळत आहे. फोल्डेबल आयफोनची चर्चा सुरु झाली. सध्या या सेगमेंटमध्ये सॅमसंगने मांड ठोकली आहे. ॲप्पलने हा वर्ग स्वतःकडे ओढण्यासाठी फोल्डेबल आयफोनवर काम सुरु केले आहे. या वर्षाच्या अखेरीस अथवा 2025 च्या सुरुवातीलाच ॲप्पलचा फोल्डेबल आयफोन बाजारात येईल.
नवी दिल्ली | 10 February 2024 : iPhone 14 आणि iPhone 15 मध्ये ॲप्पलने काही खास तंत्रज्ञान आणि इतर फीचर्स दिले. पण त्यानंतर ॲप्पलकडून काही खास प्रोडक्ट बाजारात आले नाही. पण सॅमसंगने बाजारात अनेक प्रयोग केले आहेत. तर ओप्पो सारख्या कंपन्या पण प्रयोग करण्यात मागे हटल्या नाहीत. या कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहे. बाजाराचा कल पाहता, आता ॲप्पलने पण Foldable iPhone बाजारात आणण्याची तयारी केली आहे. कंपनी फोल्डेबल आयफोनचा प्रोटोटाईप तयार करणार आहे. तंत्रज्ञाना क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, Apple चा हा अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोन, सॅमसंगच्या Galaxy Z Flip 5 ला टक्कर देईल. दोन्ही स्मार्टफोन एकदाच बाजारात उतरण्याची शक्यता आहे.
कसा असेल Apple चा फोल्डेबल स्मार्टफोन
The Information ने याविषयी एक वृत्त दिले आहे. त्यानुसार Apple कमीत कमी दोन क्लेमशेल स्टाईलचे फोल्डेबल iPhone मॉडेल्सचे प्रोटोटाईप तयार करत आहे. Samsung च्या Galaxy Z Flip डिव्हाईसमध्ये पण याप्रकराचा डिस्प्ले मिळतो. हा स्मार्टफोन हॉरिझेंटल फोल्ड होतो. सध्या या फोनची तयारी प्राथमिक अवस्थेत आहे. कंपनी यावर्षाच्या अखेरीस अथवा 2025 च्या सुरुवातीला हा स्मार्टफोन बाजारात उतरवेल.
काय सुरु आहे काम
Apple च्या फोल्डेबल स्मार्टफोनसाठी आयफोनमध्ये बरेच बदल करावे लागणार आहे. त्यासाठी कंपनी आयफोनची जाडी कमी करण्यावर काम करणार आहे. त्यामुळे जेव्हा हा स्मार्टफोन फोल्ड करण्यात येईल. त्यावेळी तो सध्याच्या आयफोनच्या आकारा इतका दिसेल. त्यासाठी या फोनच्या बॅटरीचा आकार आणि फोल्डेबल आयफोनच्या डिस्प्लेवर काम करण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple दोन फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनच्या कंपोनेट्ससाठी आशियातील एका वितरकाशी बोलणी सुरु असल्याचे समजते.
योजना पाईपलाईनमध्ये
फोल्डेबल आयफोन मॉडेल सध्या पाईपलाईनमध्ये आहे. यामध्ये सध्याच्या जनरेशनच्या iPad Mini चा आकार दिसून येईल. सध्याचे मॉडेल 8-इंच डिस्प्लेसह मिळते. सध्या Apple कडून फोल्डेबल iPhone वा iPad बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या सेगमेंटमध्ये बाजारात सॅमसंगचा दबदबा आहे.