Foldable iPhone Price: ॲप्पलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत काय असणार? केव्हा येणार बाजारात?
आयफोन कंपनी आपल्या वहिल्या फोल्डेबल आयफोनवर जोमाने काम करत आहे. या डिव्हाइसबद्दल अशी बातमी आहे की तो २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकते.

Apple चा पहिला वहिला फोल्डेबल आयफोन लवकरच बाजारात येणार असल्याचे वृत्त आहे. Apple चा फोल्डेबल फोन कसा असणार आहे याती उत्सुकता सर्वांना लागली आहे. Apple चा हा फोन प्रिमियम कॅटगरी अंतर्गत महागड्या प्राईस टॅगसह लाँच होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्री एनालिस्ट Tim Long यांनी दावा फोल्डेबल आयफोनला अमेरिकेत २३०० डॉलर ( सुमारे १,९१,००० ) पर्यंत किंमत असण्याची शक्यता असते.
यासंदर्भात बातमी अशी आहे की कंपनी आपल्या फोल्डेबल iPhone वर काम करीत आहे. ॲप्पलचा हा डिव्हाईस लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या फोल्डेबल आयफोन संदर्भात अनेक वंदता आहेत. एप्पलने पहिल्या फोल्डेबल आयफोनला साल २०२६ मध्ये उतरविण्याची शक्यता आहे. किंवा साल २०२७ च्या सुरुवातीला देखील कंपनी या फोल्डेबल फोनला बाजारात आणू शकते.
या आयफोनची संभाव्य किंमत
या फोल्डेबल आयफोनची किंमत २००० डॉलर ते २,५०० डॉलरला ( १,६६,००० ते २,०८, ००० रुपये ) बाजारात उतरवले जाऊ शकते. आता टीम लॉन्ग यांनी देखील या आयफोनला बाजारात या प्राईस रेंजमध्ये उतरणार असल्याचे म्हटले आहे.