पुन्हा चौकाचौकात राडा अन् धूर, PUBG चं भारतात कमबॅक? वाचा सविस्तर

पबजी इंडिया हा गेम कधी लाँच केला जाणार? असा सवाल गेल्या तीन महिन्यांपासून पबजीच्या चाहत्यांना सतावतोय. (PUBG Mobile India)

पुन्हा चौकाचौकात राडा अन् धूर, PUBG चं भारतात कमबॅक? वाचा सविस्तर
PUBG Mobile India
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:04 PM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर काहीजण असंही म्हणत आहेत की पबजी गेम भारतात परतण्याच्या शक्यता आता मावळल्या आहेत. दरम्यान, पबजी मोबाईल इंडिया हा गेम लवकरच भारतात लाँच होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. (PUBG Mobile India launch latest update: Check out Battleground Mobile India launch info)

पबजी मोबाइल इंडियाची (PUBG Mobile India) भारतातली क्रेझ अजूनही संपलेली नाही. कित्येक महिने वाट पाहिल्यानंतरही चाहत्यांच्या आशा जिवंत आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी भारतीय चाहत्यांसमवेत असेच काहीसे घडले, जेव्हा पबजी मोबाइल इंडियाने एकाच वेळी 4 नवीन ट्रेलर अपलोड करण्यात आले होते. ही सूचना पाहून चाहते खूप उत्साही झाले होते, परंतु काही काळानंतर ते निराश झाले कारण कंपनीने ते सर्व व्हिडिओ त्वरित डिलीट केले.

दरम्यन, पबजी मोबाईल इंडिया या गेमच्या लाँचिंगबाबत काही विस्वसनिय सूत्रांनी माहिती दिली आहे की लवकरच हा गेम भारतात लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कंपनी यावेळी वेगळ्या नावासह गेम लाँच करु शकते. तर काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा गेम आता भारतात लाँच होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.

लवकरच लाँच होणार PUBG

नुकताच काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हा गेमल लवकरच भारतात पुनरागमन करेल. रिपोर्ट्सनुसार नवा गेम भारता Battleground Mobile India या नावासह लाँच केला जाऊ शकतो. PUBG Mobile India ची ऑफिशियल वेबसाईट आता नवी क्रिएटिव्ह कंपनी म्हणून सुरु आहे. तसेच ही कंपनी नव्या नावासह भारतात त्यांचा गेम लाँच करु शकते. PUBG Mobile च्या भारतीय व्हर्जनचं नाव ‘Battleground Mobile India’ असं असेल. ही माहिती नवीन पोस्टर विमोवरील एका व्हिडीच्या एम्बेड लिंकवरुन मिळाली आहे.

ऑल न्यू पबजी मोबाईल कमिंग टू इंडिया

दोन दिवसांपूर्वी काही मिनिटांसाठी जारी केलेले ट्रेलर बघून असे वाटले होते की, काहीतरी नवीन जाहीर करत आहे, परंतु असे झाले नाही. 29 एप्रिल रोजी पबजी मोबाइल इंडियाने आपल्या सब्सक्रायबर्सना एक नोटिफिकेशन पाठवलं होतं. लोक गेल्या वर्षापासून या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करत आहेत. जेव्हा बर्‍याच लोकांनी नोटिफिकेशन ओपन करुन सर्च केले की, पबजी मोबाईल इंडिया भारतात पुनरागमन कधी करणार आहे? तेव्हा त्यांच्या हाती काहीच लागलं आहे. परंतु त्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं होतं की, ऑल न्यू पबजी मोबाईल कमिंग टू इंडिया. परंतु काही मिनिटातच तो ट्रेलर डिलीट करण्यात आला. अशा परिस्थितीत ट्रेलर पाहणाऱ्या युजर्सना निराश व्हावे लागले आहे. या 4 ट्रेलरमध्ये काहीही नवीन नव्हते, हे व्हिडीओ गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधले होते. गेल्या वर्षीही पाबजीने असेच काहीसे व्हिडीओ शेअर केले होते.

अद्याप आशा जिवंत

भारतात PUBG Mobile लाँच होण्यासंबंधी अद्याप कोणतीही पक्की बातमी समोर आलेली नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की PUBG कॉर्पोरेशनने अद्याप आशा सोडलेली नाही. भारतात या गेमसाठीचं अप्रूव्हल मिळवण्यात अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या बाजूला पबजीने भारतात एका कंपनीची स्थापना केली आहे, तिथे लोकांना कामावर घेतलं जात आहे. अलीकडेच, PUBG कॉर्पोरेशनने Investment & Strategy Analyst हायर करण्यासाठी लिंक्डइनवर जॉब व्हॅकेन्सी पोस्ट केली होती. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीने म्हटलं होतं की, उमेदवाराला भारत आणि MENA क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेचे आणि जागतिक कराराच्या प्रवाहाचे मूल्यांकन करणे तसेच त्यांच्या ग्लोबल टीम्सना असिस्ट करणे यांसारखी कामं करावी लागतील.

नव्या गेममध्ये बदल केले जाणार

कंपनीने घोषणा केली आहे की, PUBG Mobile India नावाचा एक नवीन गेम लाँच केला जाणार आहे. यात काही बदल केले जातील जे पूर्णपणे इंडियन गेमर्ससाठी असतील. हा गेम व्हर्च्युअल सिम्युलेशन ट्रेनिंग गाऊंडमध्ये सेट केला जाईल आणि नवीन कॅरेक्टर्स क्लोथ अँड ग्रीन हिट इफेक्ट्स स्टार्ट करु शकतील. PUBG कॉर्पोरेशन भारतात आपली व्याप्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या नोकरीच्या ड्स्क्रीप्शनमधून याचा अंदाज लावता येईल. दरम्यान, असेही सांगण्यात आले आहे की, ही जॉब व्हॅकेन्सी कंपनीच्या बंगळुरु येथील कार्यालयासाठी आहे.

जबरदस्त गेमप्ले

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे

कन्फर्म! PUBG Mobile India लाँच होणार, हा घ्या पुरावा

बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई

Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

(PUBG Mobile India launch latest update: Check out Battleground Mobile India launch info)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.