Infinix Hot 12 Play : इनफिनिक्सच्या हॉट 12 प्लेवर मिळवा बंपर डिस्काउंट… काय आहे ऑफर जाणून घ्या…
इनफिनिक्स हॉट 12 प्ले स्मार्टफोन 4GB + 64GB व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास त्याची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याविषयी अधिक आमच्याकडून जाणून घ्या...
नवी दिल्ली : इनफिनिक्स (Infinix) आपल्या अपकमिंग स्मार्टफोनमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक दिवसांपासून ग्राहक आपल्या बजेट स्मार्टफोनची (Budget smartphone) वाट बघत होते. त्यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. फोनमध्ये देण्यात आलेले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व त्याच्या किंमतीमुळे इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन चर्चेचा विषय ठरला होता. कमी किमतीत स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर्स मिळत असल्याने हा स्मार्टफोन अनेकांच्या पसंतीला उतरला आहे. हा बजेट स्मार्टफोन असल्याने साहजिकच कमी किेंमतीत समाधानकारक फीचर्स (Features) मिळत आहेत. आज या लेखातून इनफिनिक्सच्या अशाच एका स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या, या मोबाईलमध्ये कोणते फीचर्स आहेत. तेही जाणून घ्या. यामुळे तुम्हाला मोबाईल घेताना फायदा होऊ शकेल.
29 टक्के डिस्काउंट
इनफिनिक्स हॉट 12 प्ले स्मार्टफोन 4GB + 64GB व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास त्यांची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 29 टक्के डिस्काउंटनंतर केवळ 8,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हणजेच काहीही न करता फोनवर सुमारे साडेतीन हजार रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय फोनवर अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत.
एक्सचेंज ऑफर
ग्राहकांना फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक़्के कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय 3500 रुपयांची वेगळी सूटही मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगली फीचर्स देण्यात आली असून याची डिझाईनही आकर्षक आहे. ग्राहक एक्सचेंज ऑफरमध्येही फोन खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन विकत घेतल्यावर ग्राहकांना 7,750 रुपयांची सूट मिळू शकते. इनफिनिक्स हॉट 12 प्लेवर 1 वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. यासोबतच फोन अॅक्सेसरीजची 6 महिन्यांची वॉरंटी दिली जाईल. ऑर्डर केल्यानंतर फोन 2 दिवसात डिलिव्हरी केली जाणार आहे. फोनचा कॅमेरा 13MP + डेप्थ लेन्ससह येतो. यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
काय आहे फीचर्स
इनफिनिक्स हॉट 12 प्लेला 6000mAh बॅटरी मिळते. स्मार्टफोनचा वेगही खूप महत्त्वाचा आहे. यामुळे ग्राहकांना यामध्ये Unisoc T610 प्रोसेसर देण्यात आला आहे. दरम्यान, प्रोसेसरचा स्पीड काही खास नसला तरी, दैनंदिन कामे पूर्ण करताना कुठलीही अडचण येत नाही. फोनमध्ये HD + पंच होल डिसप्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.