iPhone : आयफोन 12 आणि 11 वर मिळवा बंपर डिस्काउंट, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलवर धमाकेदार ऑफर

तुम्हाला जर बजेटमध्ये आयफोन 12 (iPhone 12) आणि आयफोन 11 (iPhone 11) खरेदी करायचा असेल तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही कारण सध्या या दोन्ही फोनवर फ्लिपकार्ट सेलमध्ये चांगली ऑफर मिळत आहे. केवळ डिस्काउंटच नाही तर, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

iPhone : आयफोन 12 आणि 11 वर मिळवा बंपर डिस्काउंट, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलवर धमाकेदार ऑफर
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 2:37 PM

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि त्यातच जर तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण तुम्हाला आयफोनच्या (iPhone) खरेदीवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. आयफोन 14 सीरीज लवकरच लाँच होणार आहे. लाँच करण्यापूर्वी, ग्राहक सवलतीच्या दरामध्ये आयफोन 11 (iPhone 11) आणि आयफोन 12 (iPhone 12) ची खरेदी करू शकणार आहेत. या दोन्ही फोनवर फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. 6 जुलैपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 10 जुलैपर्यंत सुरू राहणार असून, ग्राहकांना केवळ दोनच दिवस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक सवलतीत iPhone 13 देखील खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध नसला तरी Amazon, Imagine, Croma सारख्या स्टोअर्सवर डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट सेलवर खरेदी केल्यास सिटी बँक कार्डवर 10 टक्के सूट देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 2000 रुपयांपर्यंतची इंस्टंट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

काय आहे ऑफर?

ग्राहक फ्लिपकार्ट सेलमधून 42,999 रुपयांमध्ये iPhone 11 खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. या स्मार्टफोनचा 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत साधारणत: 47,999 रुपये आहे. ग्राहकांकडे सिटी बँकेचे कार्ड असल्यास त्यावर अतिरिक्त 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. यानंतर फोनची किंमत 40,999 रुपये होईल. फ्लिपकार्टवर 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज केल्यानंतर फोनची किंमत 30,999 रुपये होईल. एक्स्चेंज व्हॅल्यू फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयफोन 12 वर देखील सूट

ग्राहक सवलतीत iPhone 12 देखील खरेदी करू शकता. त्याच्या 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. फोनचे 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंट अनुक्रमे 59,999 आणि 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावरही सिटी बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनवर 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. ज्या ग्राहकांना नवीन आयफोन घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आयफोन 12 हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना iPhone 11 पेक्षा चांगले परफॉर्मन्स आणि अधिक अपडेट्स देखील मिळतील. iPhone 14 लाँच केल्यानंतर कंपनी त्याची किंमत आणखी कमी करू शकते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.