Amazon Offer | अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शनवर 50 टक्के सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

| Updated on: May 31, 2021 | 3:24 PM

ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी भारतात वार्षिक सबस्क्रिप्शन 499 रुपये आणि तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन 164 रुपयांच्या प्रभावी किंमतीत देत ​​आहे. (Get discount on Amazon Prime subscription, know about offer)

Amazon Offer | अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शनवर 50 टक्के सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात
Follow us on

नवी दिल्ली : अमेझॉन इंडिया(Amazon India)ने नव्या प्राईम मेंबर्ससाठी यूथ ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये 18-24 वर्ष वयोगटातील ग्राहकांसाठी 500 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. ही ऑफर तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन किंवा वार्षिक सब्सक्रिप्शन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे. अ‍ॅमेझॉनने ही ऑफर केवळ अँड्रॉईड(Android) वापरकर्त्यांसाठी आणली आहे आणि डेस्कटॉप किंवा आयओएस(iOS) अ‍ॅपद्वारे रिचार्ज करणार्‍यांना ही ऑफर लागू होत नाही. (Get discount on Amazon Prime subscription, know about offer)

अमेझॉन प्राईम फ्री डिलीवरी, अमेझॉन प्राईम व्हिडिओचा एक्सेस, अमेझॉन म्युझिक आणि यासारखे बरेच काही फायदे अनलॉक करतो. ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी भारतात वार्षिक सबस्क्रिप्शन 499 रुपये आणि तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन 164 रुपयांच्या प्रभावी किंमतीत देत ​​आहे. या युवा ऑफरचा लाभ केवळ 18-24 वर्षे वयोगटातील तरुण घेऊ शकतात. याशिवाय कोणत्याही अँड्रॉईड अॅप व मोबाईल ब्राउझरद्वारेच या ऑफरवर प्रवेश केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की ही ऑफर आयओएस अॅपवर लागू नाही, परंतु मोबाईल ब्राउझरद्वारे अमेझॉन अ‍ॅपवर लॉग इन करून याची पूर्तता केली जाऊ शकते.

ग्राहकांसाठी आयडी प्रूफ आवश्यक

अमेझॉन वापरकर्त्यांच्या वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी 999 रुपये आणि 3 महिन्यांसाठी 329 रुपये भरावे लागतील. त्यानंतर वयाचे व्हेरिफिकेशन अपलोड केल्यानंतर पात्र ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकेल. आयडी प्रूफ (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) आणि सेल्फी अपलोड करून ग्राहकांना त्यांचे वय व्हेरिफाय करावे लागेल. एकदा व्हेरिफाय झाल्यानंतर 500 रुपये (वार्षिक वर्गणीसाठी) किंवा 165 रुपये (तीन महिन्यांच्या वर्गणीसाठी) ग्राहकांच्या अमेझॉन पे बॅलन्स खात्यात 48 तासांच्या आत जमा केले जातील. हे पैसे अमेझॉनकडून वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

प्राईम मेंबरशिपवर 50 टक्के सूट

या युवा ऑफरमुळे अमेझॉन प्राईम मेंबरशिपवर भारतातील निवडक ग्राहकांना 50 टक्के सवलत देत आहे. अमेझॉनने अलीकडेच भारतात त्याचे मासिक प्राईम सदस्यता थांबवले आहे, ज्याची किंमत 129 रुपये होती. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार छोट्या ऑनलाईन व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणीकरणाचा अतिरिक्त घटक(AFA) कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे मासिक रिचार्ज त्रासदायक होईल आणि गैरसोय दूर करण्यासाठी एका महिन्याचा पर्याय काढून टाकण्याचा दावा अ‍ॅमेझॉनने केला आहे. (Get discount on Amazon Prime subscription, know about offer)

 

इतर बातम्या

पुणेकरांना दिलासा, पहिले ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटर सुरु

‘लोकपत्र’चे संपादक रवींद्र तहकीक हल्ला प्रकरण, पाच जणांवर गुन्हा, मुख्य आरोपी पोलिसात शरण