Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट

सॅमसंगने दोन आठवड्यांपूर्वी Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 4:13 PM

मुंबई : सॅमसंगने दोन आठवड्यांपूर्वी Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची भारतीय मार्केटमध्ये विक्री सुरु झाली असून या स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Get Rs 10000 cashback on Samsung Galaxy S21 Ultra Sale Starts in India)

Galaxy S21 च्या बेस मॉडलची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये, Galaxy S21 प्लस ची किंमत 81,999 रुपये आणि Galaxy S21 अल्ट्रा 5 जी या स्मार्टफोनची किंमत 1,05,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Galaxy बड्स प्रो ची किंमत 15,990 रुपये इतकी आहे. दरम्यान Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक ऑफर्स, अपग्रेड बोनससहित अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना Galaxy S21 अल्ट्रा या स्मार्टफोनवर 10,000 रुपये, Galaxy S21 प्लस वर 7,000 रुपये आणि Galaxy S21 वर 5,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.

सॅमसंगच्या अपग्रेड प्रोग्रामचा भाग म्हणून अजून एक ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत असाल तर Galaxy S21 अल्ट्रा या स्मार्टफोनवर 7,000 रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जाईल. Galaxy S21 प्लस वर 6,000 रुपये तर Galaxy S21 वर 5,000 रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जाईल.

कशी आहे Samsung Galaxy S21?

सॅमसंग Galaxy S21 सिरीजमध्ये Exynos 2100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, यामधील 5G इंटिग्रेटेड मोबाईल प्रोसेसर दुसऱ्या प्रोसेसर्सच्या तुलनेत सर्वात फास्ट आहे. हे तिन्ही फोन 5 जी टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. Galaxy S21 तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर Galaxy S21+ चार कलर वेरियंटसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अंड्रॉयड 11 वर बेस्ड आहेत. तसेच हे फोन One UI 3.1 वर काम करतील. यामध्ये डुअल सिम (नॅनो) सपोर्ट देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचांचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 421ppi इतकी आहे. याचा पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचं काम करतो. गॅलेक्सी S21+ थोडा मोठा आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंचांचा आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 394ppi इतकी आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रा हा स्मार्टफोन S21 आणि S21+ या दोन्ही फोन्सपेक्षा मोठा आहे. या फोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 515ppi इतकी असून डिस्प्ले 6.8 इंचांचा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचा डिस्प्ले गॅलेक्सी नोट सिरीजच्या एस पेनला सपोर्ट करतो.

शानदार कॅमेरा आणि बॅटरी

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास S21 आणि S21+ ममध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-अँगल लेन्स 12-मेगापिक्सलची आहे. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सेकेंडरी कॅमरा 12 मेगापिक्सलचा आणि दोन लेन्स 10-10 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी S21+ मध्ये 4800mAh ची तर S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही फोन 25W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

हेही वाचा

शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, 7 हजारांहून कमी किमतीतील Best स्मार्टफोन

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

108MP कॅमेरासह सॅमसंगच्या Galaxy S21 सिरीजचे तीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Get Rs 10000 cashback on Samsung Galaxy S21 Ultra Sale Starts in India)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.