Ghibli स्टाईल फोटो अपलोड करताय का? यामागे मोठी गडबड? जाणून घ्या

घिबली ट्रेंडने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पण या आधुनिक युगात तुम्ही घिबली ट्रेंड फॉलो करून चूक करत आहात का...? तुम्हाला घिबली स्टाईलचे फोटो मिळतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की वैयक्तिक फोटोंचा गैरवापर होऊ शकतो म्हणून तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Ghibli स्टाईल फोटो अपलोड करताय का? यामागे मोठी गडबड? जाणून घ्या
Ghibli photos
| Edited By: | Updated on: Apr 27, 2025 | 8:43 PM

Ghibli AI Image या स्टाईलच्या फोटोंचा ट्रेंड सोशल मिडियावर जोरदार सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच (AI)च्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो या अनोख्या स्टाईलमध्ये बदलू शकता. आता प्रत्येकजण चॅटजीपीटी आणि ग्रोक सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे वैयक्तिक फोटो अपलोड करून घिबली इमेज बनवण्यात व्यस्त आहे. सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण सोशल मीडियावर घिबली स्टाईलचे फोटो शेअर करत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते?

चॅटजीपीटी पाहिल्यानंतर एलोन मस्कने एआय चॅटबॉट Grok 3 मध्ये घिबली-शैलीतील फोटो तयार करण्याचे वैशिष्ट्य देखील समाविष्ट केले. परंतु आता डिजिटल गोपनीयतेबद्दल चिंता वाढू लागली आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर तज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत की या नवीन ट्रेंडच्या नावाखाली, ओपनएआय हजारो वैयक्तिक फोटो गोळा करू शकते आणि एआय प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करू शकते.

एकीकडे लोकं या नवीन ट्रेंडचा आनंद घेत असताना, दुसरीकडे तज्ञांनी इशारा दिला आहे की लोकं नकळतपणे त्यांचा फ्रेश फेशिअल डेटा ओपनएआयला देत आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेच्या गंभीर चिंता निर्माण होऊ शकतात. एकंदरीत, तुमच्या वैयक्तिक फोटोंच्या सुरक्षिततेवर एक मोठा धोका निर्माण होऊ लागला आहे.

हिमाचल सायबर वॉरियर्स नावाचे एक अकाउंट आहे आणि हे अकाउंट सायबर सुरक्षा तज्ञांची टीम असल्याचा दावा करते. या अकाउंटवरून सुद्धा जागरूकतेबद्दल एक पोस्ट देखील करण्यात आली आहे. ज्यामध्ये ओपनएआय या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो अपलोड करण्याचे धोका सांगितलेला आहे.

1- तुमच्या फोटोचा दुरूपयोग किंवा गैरवापर देखील केला जाऊ शकतो.

2- त्यातच तुमची कोणतीही संमती न घेता AI ट्रेनिंगसाठी तुमच्या फोटोचा वापर केला जाऊ शकतो.

3- तसेच या घिबली फोटो ट्रेंडच्या नादात तुमचे फोटो डेटा ब्रोकर टारगेटेड जाहिरातींसाठी फोटो विकू शकतात.

लक्षात ठेवा

ओपनएआयने अद्याप घिबली-शैलीतील एआय इमेज आर्ट आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही विधान जारी केलेले नाही. अर्थात, कंपनीने कोणतेही विधान जारी केलेले नाही, परंतु गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, आता तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो घिबलीसाठी एआय प्लॅटफॉर्मवर शेअर करायचे की नाही हे तुमचा निर्णय आहे.