स्मार्टफोनवर मुली करतात या अॅप्सचा सर्वाधीक वापर, सर्वेक्षणात समोर आली माहिती

अहवालात असे दिसून आले आहे की भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे, परंतु केवळ 11.3 टक्के भारतीय महिला पेमेंटसाठी स्मार्टफोन वापरत आहेत.

स्मार्टफोनवर मुली करतात या अॅप्सचा सर्वाधीक वापर, सर्वेक्षणात समोर आली माहिती
स्मार्टफोन अॅपImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:01 PM

मुंबई : एका अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार भारतीयांचा स्मार्टफोनवर (Smartphone) घालवलेल्या वेळेत 50 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये 11.3 टक्के भारतीय महिला पेमेंट (Payment app) करण्यासाठी स्मार्टफोन वापरत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस इनोव्हेशन स्टार्ट-अप बॉबल एआयच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की केवळ 6.1 टक्के महिला गेमिंग ऍप्लिकेशन्सवर सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, या अहवालात फूड अॅप्स वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त म्हणजेच 23.5 टक्के इतके असल्याचेही दिसून आले आहे.

महिला या अॅप्सचा करतात सर्वाधिक वापर

अहवालात असे दिसून आले आहे की भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे, परंतु केवळ 11.3 टक्के भारतीय महिला पेमेंटसाठी स्मार्टफोन वापरत आहेत. अहवालानुसार, महिलांचा सहभागही अॅपनुसार बदलतो. केवळ 6.1 टक्के महिला गेमिंग अॅप्सवर सक्रिय आहेत तर 23.5 टक्के महिला फूड अॅप्सवर आहेत. कम्युनिकेशन अॅप्स 23.3 टक्के आणि व्हिडिओ अॅप्समध्ये 21.7 टक्के महिलांचा सहभाग आहे जो पेमेंट अॅप्स आणि गेमिंग अॅप्सपेक्षा जास्त आहे.

हा अहवाल बॉबल AI च्या सेल फोन वापर ट्रेंड आणि विविध प्लॅटफॉर्मवरील बाजार आणि वापरकर्त्यांची गरज समजून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासावर आधारित आहे. अहवालात 85 दशलक्षाहून अधिक अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या वापरातून निर्माण झालेला डेटा वापरला आहे. हा अहवाल 2022 आणि 2023 मधील डेटावर आधारित आहे आणि भारतीय ग्राहकांसाठी मोबाइल वापर ट्रेंडचे विश्लेषण केले आहे.

हे सुद्धा वाचा

सातत्याने वाढत आहे स्मार्टफोनचा वापर

अहवालानुसार, जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत स्मार्टफोनवर घालवलेला एकूण वेळ सतत वाढत आहे. डेटा दर्शवितो की सरासरी फोन वापर 2022 मध्ये महिन्याच्या 30 टक्क्यांवरून 2023 मध्ये 46 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पुढे, डेटामध्ये असेही आढळून आले की वापरकर्ते त्यांच्या मोबाइल कीबोर्डवर दररोज सरासरी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ घालवतात. एकूण डेटामध्ये असे आढळून आले की वापरकर्त्यांनी 2022 च्या तुलनेत 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यांत त्यांच्या स्मार्टफोनवर 50 टक्के जास्त वेळ घालवला.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारत आपला बहुतेक वेळ कम्युनिकेशन अॅप्स, सोशल मीडिया अॅप्स आणि व्हिडिओ अॅप्सवर घालवतो (एकूण 76.68 टक्के), आणि उर्वरित अॅप्स वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर घालवलेल्या एकूण वेळेच्या 23 टक्क्यांहून अधिक वेळ देतात.  इतर अॅप्समध्ये, जीवनशैली अॅप्स सर्वात आकर्षक म्हणून उदयास आले आहेत, वापरकर्ते या श्रेणीतील अॅप्सवर त्यांचा 9 टक्क्यांहून अधिक वेळ घालवतात. या श्रेण्यांव्यतिरिक्त, फायनान्स, गेमिंग, संगीत आणि मनोरंजन अॅप्समध्ये वेळ घालवण्याच्या संदर्भात 1 टक्क्यांहून अधिक व्यस्तता दिसून आली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.