Mail आलेला समजत नाहीये? फोनमध्ये चालू करा ‘ही’ सेटिंग

जर तुम्हालाही आवश्यक मेल्स आलेले समजत नसेल तर हे फीचर नक्की ऑन करा. यानंतर तुमचा कोणताही महत्त्वाचा मेल मिस होणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची किंवा नव्या फीचर्सची गरज भासणार नाही, फोनमधील मेल सेक्शनमधील फीचर काम करेल.

Mail आलेला समजत नाहीये? फोनमध्ये चालू करा 'ही' सेटिंग
Mail आलेला समजत नाहीये? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 3:25 PM

कामाच्या बाबतीत प्रोफेशनल रित्या मेल पाठवण्यासाठी जगभरातील लोक जीमेलचा वापर करतात. कंपनी असे अनेक फीचर्स ऑफर करते, ज्याच्या मदतीने तुम्ही उत्तमोत्तम ईमेल सहज पाठवू शकता. दुसरीकडे पाहिले तर अनेकांच्या फोनमध्ये कामाच्या बाबतीत मेल आल्याचे समजत नाही. अशावेळेस चिंता करण्याची गरज नाहीये कारण तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही कोणताही महत्त्वाचा मेल मिस करणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमधील एक छोटी सेटिंग ऑन करावी लागेल. यानंतर कोणताही मेल तुमच्या नजरेतून सुटणार नाही. खरं तर अनेकदा फोनमध्ये मेल येतो पण तुम्हाला माहित नसतं. २-३ दिवसांनी चेक केल्यानंतर समजते की मेल आलेले आहेत. पण तोपर्यंत महत्त्वाच्या मेल्सची तारीख निघून जाते. अशावेळी मेल वेळेत न दिसल्याकारणाने तुमचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी पटकन ही सेटिंग ऑन करा.

या स्टेप करा फॉलो

  • यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. सेटिंग्जमध्ये सर्च बारमध्ये फेच टाइप करून सर्च करा. त्यानंतर फेच न्यू डेटा ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल.
  • फेच न्यू डेटा या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही पुढच्या पानावर जा. येथेही तुम्हाला फेच न्यू डेटा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • हे ऑप्शन ऑटोमॅटिकली सेट होतो. ही सेटिंग तुम्हाला बदलावी लागेल.
  • फोन नेट किंवा वायफायशी कनेक्ट झाल्यावरच तुमचा जीमेल ऑटोमॅटिकमध्ये बॅकग्राऊंड रिफ्रेश होतो. ही सेटिंग काढून तुम्ही इथे दिलेल्या पर्यायांपैकी एका पर्यायात बदलू करू शकता. तुम्ही यात बॅकग्राऊंड रिफ्रेश सेटिंग मॅन्युअली किंवा 30 मिनिटे ते 15 मिनिटांत सेट करू शकता. जेणेकरून तुमचं जीमेल रिफ्रेश होत राहते. आणि तुम्हाला नवीन मेल नोटिफिकेशन मिळत राहते.

मॅग्निफायर कॅमेऱ्याचा वापर

वर नमूद केलेल्या सेटिंग्जनंतर तुम्ही आयफोनवर आणखी एक खास फीचर वापरू शकता. आयफोनमधील Magnifier कॅमेरा वापरून तुम्ही तुमचे बरेच से काम सोपे करू शकता. यासाठी ॲप्स सेक्शनमध्ये जाऊन Magnifier टाईप करून सर्च करा. यानंतर Magnifier कॅमेरा आयकॉन ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, आता तुम्ही कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा सामान्य कॅमेऱ्यासारखाच काम करतो.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.