आकर्षक ऑफर्ससह जिओ फोन 2 खरेदी करण्याची सुवर्ण संधी
मुंबई : तुम्ही जिओ फोन 2 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यापेक्षा चांगली संधी नाही. या दिवाळीत 5 ते 12 नोव्हेंबर या काळात चालणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये तुम्हाला jio.com वर फोन खरेदी करता येणार आहे. 5 नोव्हेंबर म्हणजे आज 12 वाजल्यापासून ते 12 नोव्हेंबरपर्यंत हा फोन खरेदी करता येईल. या फोनवर खास ऑफर म्हणजे पेटीएमवर […]
मुंबई : तुम्ही जिओ फोन 2 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यापेक्षा चांगली संधी नाही. या दिवाळीत 5 ते 12 नोव्हेंबर या काळात चालणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये तुम्हाला jio.com वर फोन खरेदी करता येणार आहे. 5 नोव्हेंबर म्हणजे आज 12 वाजल्यापासून ते 12 नोव्हेंबरपर्यंत हा फोन खरेदी करता येईल.
या फोनवर खास ऑफर म्हणजे पेटीएमवर जिओ फोन 2 खरेदी केल्यास 200 रुपये कॅशबॅक मिळेल. जिओचा याआधीही फ्लॅश सेल झाला होता. जुलै महिन्यात लाँच केलेल्या या फोनला मोठ्या प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी कंपनीने जिओ फोन लाँच केला होता, ज्याचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.
जिओ फोन 2 खरेदी करण्यासाठी ऑफर्स
2999 रुपयांचा हा फोन खरेदी करण्यासाठी कंपनीकडून अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 49 रुपयात एकूण एक जीबी डेटा, फ्री अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 50 मेसेजेस मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल.
ऑफरमध्ये दुसरा पॅक 99 रुपयांचा आहे, ज्यात 28 दिवसांसाठी प्रतिदिन चार जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 मेसेजेस मिळतील. यामध्येच 153 रुपयांचा प्लॅनही आहे, ज्यात 28 दिवसांसाठी प्रतिदिन 1.4 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 मेसेजेस मिळतील.
जिओ फोन 2 चे फीचर्स
512 एमबी रॅम
4 जीबी इंटर्नल स्टोरेज
kaiOS ऑपरेटिंग सिस्टम
2000 mAh क्षमतेची बॅटरी