Airtel युजर्ससाठी खुशखबर! कंपनीकडून मोफत 6 GB का डेटा
जियो, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या ग्राहकांना विशेष ऑफर देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत
मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा हल्ली वाढली आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स जियो, एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया सारख्या अनेक कंपन्या ग्राहकांना विशेष ऑफर देत आहेत. त्याद्वारे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून सुरु आहे. दरम्यान, एअरटेलने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे, कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 6 जीबी डेटा कूपन देत आहे. (Good news for users, Airtel offering upto 6 GB data coupon for free)
ही एक अॅप एक्सक्लुझिव्ह ऑफर आहे, त्यामुळे कूपन मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना एअरटेल थँक्स अॅपद्वारे रिचार्ज करावा लागेल. विशेष म्हणजे, ही टेलिकॉम कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 1 जीबी कूपनच्या जागी 6 जीबी डेटा ऑफर करत आहे. दरम्यान या ऑफरसाठी पात्र ठरलेल्या युजर्सना (वापरकर्त्यांना) मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. ही ऑफर क्रॅक करण्यासाठी किंवा क्लेम करण्यासाठी तुम्हाला कंपनीने सांगितलेल्या काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे किमान 291 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज (Minimum Prepaid Recharge) करावा लागेल.
- एयरटेल 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 289 रुपये, 299 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये आणि 448 रुपयांच्या रिचार्जवर 1GB डेटाचे दोन कूपन देईल. हे फ्री डेटा कूपन 28 दिवसांसाठी वैध असेल.
- ग्राहकांना 1GB डेटाचे चार कूपन मिळवण्यासाठी 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्जसह त्यांच्या प्रिपेड नंबरवर रिचार्ज करावा लागेल. हे कूपन 56 दिवसांसाठी वैध असतील.
- 598 रुपये आणि 698 रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनमध्ये (Prepaid recharge plan) प्रत्येकी 1GB (84 दिवसांसाठी वैध) चे एकूण 6 कूपन दिले जातील.
6 जीबी डेटा कूपनचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स अॅप कसे वापरायचे याबद्दलचा संपूर्ण तपशील जाणून घ्या
स्टेप 1- तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर एअरटेल थँक्स अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
स्टेप 2- थँक्स अॅपवर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
स्टेप 3- आता तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. तसेच या अॅपला तुमच्या कॉल आणि मेसेजेसचा अॅक्सेस द्यावा लागेल.
स्टेप 4- त्यानंतर अॅपवरील माय कूपन सेक्शनवर क्लिक करा. ऑफर क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोड लिहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ऑफर मिळेल.
इतर बातम्या
आता मोबाईल बिल महागणार, दूरसंचार कंपन्या शुल्क वाढवण्याच्या तयारीत
जिओची धमाकेदार ऑफर, रिचार्ज करा आणि मिळवा एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक
High-Speed Night Data offer | खुशखबर ! ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना रात्री मोफत इंटरनेट, जाणून घ्या अटी
(Good news for users, Airtel offering upto 6 GB data coupon for free)