गुगलमध्ये मोठे बदल होणार, युजर्सना दारु आणि जुगाराशी संबंधित जाहिराती हटवण्याचे अधिकार मिळणार

गुगलने काही महिन्यांपूर्वी त्यांचं जाहिरात धोरण (Advertising Policy) बदललं आहे.

गुगलमध्ये मोठे बदल होणार, युजर्सना दारु आणि जुगाराशी संबंधित जाहिराती हटवण्याचे अधिकार मिळणार
गुगलचे फ्री स्टोरेज पर्याय बंद होणार
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 11:57 PM

वॉशिंग्टन : गुगलने (Google) नुकतीच घोषणा केली आहे की, ते लवकरच युजर्सना काही कंट्रोल्स देणार आहेत. या कंट्रोल्सद्वारे युजर्स जुगार आणि मद्याशी (दारुशी) संबधित जाहिराती स्वतः हटवू शकतात. गुगलने म्हटलं आहे की, हे फिचर पुढील वर्षी युजर्ससाठी रोलआऊट केलं जाईल. टप्प्याटप्प्याने सर्व युजर्सपर्यंत हे फिचर पोहोचेल. सर्वप्रथम अमेरिकेत हे फिचर लाँच केलं जाईल. दरम्यान, जुगार आणि दारूच्या जाहिरातींबद्दल कायदेशीर प्रतिबंध असलेल्या देशांमध्ये त्यांच्या धोरणांमध्ये कोणताही बदल दिसणार नाही. (Google allows YouTube users to limit access to ads for alcohol and gambling)

एका ब्लॉगपोस्टमध्ये कंपनीने सांगितलं की, युट्यूब युजर्सना आता जाहिराती मर्यादित करण्याचे कंट्रोल्स दिले जाणार आहेत. यामध्ये आता जुगार आणि दारुशी संबंधित जाहिरातींचा समावेश केला जाणार आहे. यासाठीच कंपनी आता सेटिंग्समध्ये नवं फिचर देणार आहे. त्यामुळे युजर्स आता अशा प्रकारच्या जाहिराती पूर्णपणे बंद करु शकतील. गुगलने काही महिन्यांपूर्वी त्यांचं जाहिरात धोरण (Advertising Policy) बदललं आहे.

नव्या फिचर्सबाबत सांगताना कंपनीने म्हटले की, आम्हाला काही युजर्सकडून फिडबॅक मिळाला होता की, काही विशिष्ट जाहिराती त्यांना नको आहेत किंवा त्यावर मर्यादा असावी. त्यामध्ये प्रामुख्याने दारु आणि जुगाराशी संबंधित जाहिरातींचा उल्लेख करण्यात आला होता. कंपनीने या फिडबॅकवर विचार करुन या जाहिरातींबाबतचे निर्णय घेण्याची जबाबदारी युजर्सवर सोपवली आहे. युजर्स स्वतःच्या इच्छेने अशा प्रकारच्या जाहिराती बंद करु शकतात. त्यासाठीचं नवं फिचर सेटिंग्समध्ये अॅड केलं जाईल.

दरम्यान, गुगलने दारु आणि जुगाराशी संबंधित जाहिराती मॅनेज करण्याबाबतचं फिचर आणलं असलं तरी ते 100 टक्के सक्षम असेलच, याची खात्री कंपनीनेही दिलेली नाही. परंतु आम्ही युजर्सच्या मागणीनुसार (युजर्सने सेटिंग्समध्ये जाऊन संबंधित जाहिराती मॅनेज केल्यानंतर) त्यांना अधिकाधिक चांगली सेवा प्रदान करणार आहोत. युजर्सने सेटिंग्स बदलल्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या जाहिराती दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे.

जाहिराती तुम्हीच ठरवता?

ही बातमी वाचत असताना तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी, ती म्हणजे ज्या जाहिराती तुम्हाला ब्राऊझिंगदरम्यान दिसतात, त्या तुमच्याच ब्राऊझिंग हिस्ट्रीशी निगडीत असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनसारख्या कोणत्याही ई-कॉमर्स साईटवर एखादी वस्तू सर्च केलीत, परंतु ती खरेदी केली नाहीत. तर त्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राऊझरमधून काहीही सर्च करा, कोणत्याही साईटला भेट द्या तिथे तुम्हाला तुम्ही ई-कॉमर्स साईटवर पाहिलेल्या वस्तूची जाहिरात किंवा संबंधित वस्तूंची जाहिरात पाहायला मिळेल.

इतर बातम्या

YouTube व्हिडीओद्वारे Corona Vaccine बाबतची प्रत्येक अपडेट, फेक न्यूजना लगाम बसणार

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती

बापरे! Google Photos मध्ये फोटो साठवून ठेवण्यासाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

(Google allows YouTube users to limit access to ads for alcohol and gambling)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.